मिशन कवचकुंडल अभियान यशस्वी करू या-
प्रांताधिकारी अजित नैराळे
संजय गायकवाड-कर्जत
शासनाने 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत कोव्हीड -19 लसीकरणासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून आज दि.11 ऑक्टोबर रोजी मिशन कवच कुंडल अभियान अंतर्गत येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात इनरव्हील क्लब कर्जत आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
लसीकरण शिबीर सुरू होते त्या ठिकाणी एक परदेशी महिला सभा मोहंमद अलवान या आल्या व त्यांनी शिबिर आयोजकांना मला ही लस घ्यायची आहे असे सांगितले. त्याचा पासपोर्ट बघून आयोजकांनी त्या परदेशी महिलेचे लसीकरण केले.
शिबिराचे उदघाटन कर्जतचे उपविभागीय अधिकारी अजित नैराळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसिलदार विक्रम देशमुख, नायब तहसिलदार सुधाकर राठोड, कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज बनसोडे, रविंद्र माने, कर्जत नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी उमेश राऊत, आरोग्य विभागाचे सुदाम म्हसे, इनरव्हील क्लबच्या मोनिका बडेकर, प्राची चौडीये,उत्तरा वैद्य,पल्लवी सावंत,सरस्वती चौधरी, शिल्पा दगडे, ज्योत्स्ना शिंदे, सुलोचना गायकवाड, शीला गुप्ता, वनिता सोनी उपस्थित होत्या.
मनाली लोहकरे हिने लसीचा पहिला डोस घेऊन लसीकरण शिबिराचा शुभारंभ केला.उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली नर्स ज्योती वाव्हळ यांनी लसीकरण केले.यावेळी केवल वारीक, शाहीन मुजावर, प्रतिक्षा सिंग, विनायक पवार, रोहित मोरे यांनी त्यांना सहकार्य केले.ज्योत्स्ना शिंदे यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केलं.या शिबिरात 200 लाभार्थींनी लाभ घेतला.