Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात मोटर सायकल रॅली.

 स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्ह्यात मोटर सायकल रॅली

              सुधीर पाटील-सांगली


 एकरकमी  एफआरपी मिळाली पाहिजे, वजना तील काटा मारी बंद झाली पाहिजे,  तोडीला मोजाव्या लागणाऱ्या पैशाची पद्धत बंद झाली पाहिजे   महापुरात बुडालेला ऊस प्राधान्याने तोडला पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी चे  जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर मोटारसायकल रॅली काढण्यात आली  
उदगीरी येथून रॅलीला प्रारंभ झाला  त्यानंतर तुरची, तासगाव,  कुंडल,  वाळवा , साखराळे,  वांगी, कारंदवाडी, सांगली, शिरगुप्पी, कागवाड ,आरग अशी रॅली काढण्यात आली  

 यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष,महेश खराडे  म्हणाले की  कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यानी एकरकमी एफआरपी जाहीर केली असताना सागली जिल्ह्यातील साखर कारखान्याचे चेअरमन तोडातुन ब्र हि काढायला तयार नाहीत, लवकरच एकरकमी एफआरपी जाहीर करण्यात यावी .अन्यथा संघर्ष अटळ आहे,  जिल्ह्यातील सर्व कारखान्यानी एकरकमी जाहीर करावी,यावेळी टोळीला द्यावी लागणारी पैशाची पध्दत बंद करावी. पुरबाधित ऊस तोडणी प्रथम प्राधान्याने तोडीणी करावे. या सह विविध मागणी चे निवेदन सादर करण्यात आले 

   संदीप रजोबा, संजय बेले ,भागवत जाधव , राजेंद्र माने तानाजी धनवडे, सचिन महाडिक, अख्तर संडे,  भरत चौगुले, श्रीधर उदगावे ,दामाजी डबल   जगग्नाथ भोसले, प्रभाकर पाटील, तानाजी साठे,सचिन महाडिक  पांडुरंग खराडे, सुजित पाटील , राजेंद्र पाटील, भुजंग पाटील ,प्रकाश देसाई , रविकिरण माने , शहाजी पाटील, प्रकाश साळुंखे ,तानाजी साठे, प्रताप पाटील ,भैरवनाथ कदम , सुरेश पचीब्रे  ,गुडा आवटी,अरुण कवठेकर,  सुदर्शन वाडकर,  उमेश मुळे, बाळासाहेब लिंबेकाई,  भरतेश्वर पाटील, सुरेश वडगडे, मुकेश चिंचवाडे, धण्यकुमार पाटील,  रोहित वारे नागेश खामकर, प्रकाश सटाले ,अधू कुंभार, नंदू नलवडे, विश्वजित गायकवाड, आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies