कोरोनाला रोखण्यात अंगणवाडी सेविकांचा सिंहाचा वाटा :- पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे
विजय गिरी-श्रीवर्धन
आज जिल्ह्यातील सर्व अंगांवड्यामध्ये किटचे वाटप देखील रायगड जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर महिला बचत गटांना शिलाई मशीन, भजनी मंडळांना भजनाचा साहित्य आदि साहित्य वाटप होत आहे. लहान मुलांचा भवितव्य घडवण्याचं काम अंगणवाडी सेविकांच्याकडून होत असून कोरोना काळात देखील अंगणवाडी सेविकांना कार्यक्षेत्रांच्या पलीकडे जाऊन कार्य केले. याची दखल घेत महिला व बालकल्याण खात्याकडून त्यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार करण्याच्या सूचना यावेळी ना. आदितीताई तटकरे यांनी महिला व बालकल्याण सभापती जाधव यांना केल्या.
ज्यावेळी कडक निर्बंध लागू होते त्यावेळी जबाबदारी पार पाडताना कुठेही कसलीही कसर केली नाही. त्यावेळी देखील या आंगणवाडी सेविकांनी गावातील नागरिकांचा रोष घेऊन आरोग्याला प्राधान्य दिलं आहे. येत्या काही दिवसात श्रीवर्धन नगरपालिका हद्दीत लसीकरण मोहीम सुरू केली जात आहे. श्रीवर्धन न पा माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना लस देण्याचं काम करत आहोत. तालुक्यात कॅम्प सुरू आहे. शहरात सुद्धा प्रत्येक वार्डात लसीकरण राबवण्यात येणार आहे. घटस्थापना असली तरी लसीकरणात जास्तीत जास्त प्रतिसाद मिळावा जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन पालकमंत्री ना. आदितीताई तटकरे यांनी केला आहे.या वेळी श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या वतीने मोफत डिजिटल सातबारा वितरण करण्यात आले