Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीवर्धन मतदारसंघावर शेकापचा हक्क!-पंडित पाटील

 श्रीवर्धन मतदारसंघावर शेकापचा हक्क!-पंडित पाटील

जनतेच्या सेवेत शेकापक्षाने सतत राहण्यासाठी आज म्हसळ्यात उघडलं कार्यालय 

जनतेने पैशाचा हिशोब घेणे हा हक्कच!

          महाराष्ट्र मिरर टीम-म्हसळा राज्यांत जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणूकांचे वारे वाहू लागल्याने जिल्ह्यात एकेकाळी नं १ असणारा शेकापक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी श्रीवर्धन विधानसभा क्षेत्राची निवड केल्याने आज म्हसळा शहरात शेतकरी कामगार पक्षांने जनसंर्पक कार्यालयाचे उद्घाटन अलिबागचे माजी आमदार पंडीत पाटील यांनी करून राजकीय आखाड्यात शेकापक्ष उतरत आहे याची चाहूल आपल्या राजकिय विरोधकाना दिली.यावेळी झालेल्या कार्यक्रमाला तालुका चिटणीस संतोष पाटील ,माजी ता. चिटणीस परशुराम मांदाडकर, आरडीसीचे संचालक तुकाराम महाडीक,विनायक गिजे, युवानेते निलेश मांदाडकर,पांडुरंग मेंदडकर, माजी सभापती श्रीमती गौरीताई पयेर,चंद्रकांत कांबळे,सुर्यकांत तांबे,भाऊ पयेर,राजाराम धुमाळ,डॉ.किशोर कोकाटेअँड.अरुणा मांदाडकर,स्वप्नील बीराडी,रघुनाथ चाचले, सिध्दीक पठाण,अब्दुल रज्जाक धनसे,रशीद घरटकर,कानू लोणशीकर,महादेव गाणेकर, रिझवान फकीह,हरीचंद्र बसवत,नरेश म्हात्रे, प्रकाश लोणशीकर,भालचंद्र गाणेकर,प्रशांत गिजे आदी शेकापचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

   पंडीत पाटील यांनी आपल्या दिमाखदार भाषणात श्रीवर्धन मतदारसंघावर शेकापक्षाचा वारसाने नाही तर जनतेची रस्ते, शिक्षण,पाणीपुरवठा अशी मुलभूत गरजेची विकास कामे केलेली आहेत म्हणून मतदारसंघावर शेका पक्षाचा हक्क आहे. मी जिल्हा परिषद अध्यक्ष, मिनाक्षी ताई मंत्री असताना श्रीवर्धन म्हसळ्यात आम्ही अनेक विकासकामे कर्तव्य भावनेने केली.  आज जनतेपर्यत पक्ष व चिन्ह पोहोचण्यासाठी जनसंर्पक कार्यालय सुरु करत आहोत. जनतेला विकास कामाचा तपशिल मागण्याचा हक्क असल्याचे पंडीत पाटील यानी सांगताना खरसई धरण गेले अनेक वर्ष अर्धवट आहे,अनेक पाणीपुरवठा योजना आता बंद स्वरुपांत व अर्धवट आहेत ,म्हसळा शहर नळ योजनेला फिल्टरेशन फ्लँट नसणे हे योग्य नाही व जनतेच्या पैशाचा खेळ असल्याचे सांगितले. याचाच जाब आम्ही विचारणार असल्याचे पाटील यानी स्पष्ट केले.यावेळी पाटील यानी शेजारीच असलेल्या शिवसेना कार्याला सदिच्छा भेट दिली. पंडीत पाटील याना अनेक ग्रामस्थानी विविध कामांसंबधी निवेदन दिल्याचे समजते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies