माथेरान मिनीबसला अपघात, तीन जण जखमी
चंद्रकांत सुतार-माथेरान
माथेरानहून 1वाजून 30 मिनिटांनी कर्जतला जाणाऱ्या मिनी बस सेवेला डिकसळ येथे ब्रेक रोल झाल्यामुळे गाडी रस्त्यालगत खड्ड्यात उतरली त्यामुळे मिनी बसला किरकोळ अपघात झाला असून बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून दुखापत झालेले सर्व प्रवासी सुरक्षित आहेत .दुखापत झालेल्या प्रवाशांना त्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील उपचाराकरिता अन्यत्र हलविण्यात येईल असे रायगड हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले .ड्रायव्हरच्या प्रसंगवधनामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान कर्जत एसटी डेपो मॅनेजर यादव यांनी महाराष्ट्र मिररला दिलेल्या माहितीनुसार मिनी बसच्या पुढे असणाऱ्या दोन वाहनांनी स्पीड ब्रेकरवर करकचून ब्रेक लावल्याने एसटी चालक खैरे यांनी ब्रेक लावला आणि गाडी रस्ता सोडून खाली उतरली त्यात तीन जण जखमी झाले आहेत.
आनंदीकुमार चौधरी आणि अजित कोळी अशी जखमी प्रवाशांचे नांवे असून तिसऱ्या प्रवाशाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही.