Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

भविष्यात अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील नव्हे तर देशातील आदर्श मतदारसंघ ठरू शकतो:-उदय सामंत

 भविष्यात अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील नव्हे तर देशातील आदर्श मतदारसंघ ठरू शकतो:-उदय सामंत

          अमूलकुमार जैन-अलिबाग


 रायगड जिल्ह्यातील अलिबाग मतदारसंघात विरोधकांना न जुमानता आमदार महेंद्र दळवी ह्यांनी  मोठ्याप्रमाणात विकासकामे करीत आहेत.त्यामुळे भविष्यात अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील नव्हे तर देशातील आदर्श मतदारसंघ ठरू शकतो असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांच्या आढावा बैठकीत अलिबाग तालुक्यातील राजमळा येथे आयोजित बैठकीत केले.
          यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी,रायगड संपर्क प्रमुख विलास टावरी, रायगड जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे,उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, अलिबाग तालुका अध्यक्ष राजा केणी,मुरुड तालुका प्रमुख ऋषिकांत डोंगरीकर, मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील, कामगार नेते दीपक रानवडे, जिल्हा खजिनदार सुरेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

  उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की,अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी हे कोणत्याही विकास कामाशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटत नाही.उद्धव ठाकरे यांच्या सर्वात जवळचा कोण असेल तर महेंद्र दळवी आहेत.प्रसिद्धी पासून दूर राहून विकासकामे महेंद्र दळवी करीत आहेत. शिवसेना हा एक असा पक्ष आहे की,तो निवडणूक नंतरही जनतेच्या संकटात मदतीसाठी सदैव तत्पर असतो.महाराष्ट्रात अनेकांनी उच्च महाविद्यालय स्वतःसाठी मागून घेतले.मात्र महेंद्र दळवी हा असा आहे की त्याने अलिबाग  येथे शासकीय उच्च महाविद्यालय मंजूर करून घेतली आहे.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यावेळी एकेकाळी मित्रपक्ष असणाऱ्यानी खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे ह्यावरून विरोधक हे किती नीच पातळीवर जाऊ शकतात याचे उदाहरण आहे.रायगड जिल्हयात ज्यांनी कोणी शिवसेना अथवा पक्ष नेतृत्व याला आव्हान दिले असेल त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल. रायगड जिल्हापरिषद निवडणूक ही आघाडीच्या माध्यमातून लढविली जाईल, असेही संकेत सामंत यांनी दिले आहे.रायगड जिल्हा हा भगवामय झाला पाहिजे.रायगड जिल्हा हा मुबई पासून जवळचा जिल्हा आहे.कोकणात शिवसेनेला पोषक वातावरण आहे.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हापरिषदेचे 56 पैकी 52 सदस्य हे शिवसेनेचे आहेत.ज्यांनी ज्यांनी शिवसेनेला आव्हान दिले आहे ते आज मातीमोल झाले आहेत. प्रत्येक कार्यकर्ते यांनी आठवड्यातील एक दिवस पक्षासाठी दिला तरी येणाऱ्या आगामी निवडणुकीत आपल्याला हमखास यश मिळेल अशीही आशा व्यक्त केली.आगामी निवडणुकीत रायगड जिल्हा परिषदेवर भगवा फडकणार अशाही विश्वास यावेळी व्यक्त केला.अलिबाग येथे सेंटर ऑफ एक्सलेन्स साठी तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.तसेच पेण येथील तंत्र निकेतन विद्यालयासाठीसुद्धा निधी मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

आमदार तथा रायगड जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी सांगितले की,पाच जिल्हयाची जबाबदारी ही उदय सामंत यांच्याकडे आहे.त्याच्याकडे कोणताही विषय नेला तर ते काम तडीस नेले जाते.येणाऱ्या निवडणुक ही आपल्यासाठी अस्तित्वाची लढाई आहे.येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यात जी आघाडी आहे तीच आघाडी कायम राहणार आहे असे संकेत वरिष्ठ यांच्याकडून देण्यात आली आहे. आघाडीला सोबत घेऊन जायचे आहे.आपल्याला आगामी निवडणुकीत आपल्याला शेवटच्या मतदार पर्यंत पोहचणे आवश्यक आहेत.आपण केलेल्या विकासकामे ही जनतेपर्यंत गेली पाहिजे. आगामी जिल्हा परिषद निवडणूक किमान 36 जागा मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

  यावेळी जिल्हापरिषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, कामगार नेते दीपक रानवडे,संपर्क प्रमुख विलास टावरी यांनी उपस्थित कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक अलिबाग तालुका प्रमुख राजा केली यांनी केले.

यावेळी मुरुड तालुक्याच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मुरुड  तालुका महिला संघटिका शुभांगी करडे,मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्यासाहित मुरुड नगरपालिकेच्या नगरसेविका ,जिल्हापरिषद सदस्या राजश्री मिसाळ आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies