Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करा स्वाभिमानीची मागणी

 नुकसानग्रस्त द्राक्षबागांचे पंचनामे करा स्वाभिमानीची मागणी.

            सुधीर पाटील सांगली


जिल्ह्यातील सुमारे 65 हजार एकरावरील द्राक्ष बागांना अति पावसामुळे  नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे तातडीने करा एकरी लाखाची मदत द्या अन्यथा आंदोलन करू अशा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे.

उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.  जिल्ह्यात मिरज, तासगाव, जत, कवठेमहाकाळ, पलूस, वाळवा ,आणि खानापूर तालुक्यात सुमारे एक लाख द्राक्ष श्रेत्र आहे . मोठ्या प्रमाणात ऑक्टोबर महिन्यात  छाटण्या केल्या आहेत सर्व बागा फ्लोअरिंग अवस्थेत आहेत. यावेळी सतत पाऊस पडल्याने द्राक्ष घड कुज मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. घड कुजले की शेतकऱ्यांना काहीच उत्पन्न मिळत नाही. याशिवाय सततच्या पावसामुळे रात्र दिवस  औषधे फवारणी करावी लागत आहे तो खर्च ही मोठ्या प्रमाणात वाढला आहे .

द्राक्ष पीक विमा योजनेचाही काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. ही पीक  विमा योजना कंपनी  हिताची असल्याने व ती आठमही असल्याने शेतकऱ्यांनी विमा उतरला तरी कोणताच फायदा होत नाही. शेतकरी पीक विमा उतरत नाहीत त्यामुळे पीक विमा योजना बारमाही करावी तिचे निकष बदलावेत अशी मागणी करत आहोत. द्राक्ष शेतीमुळे देशाला दर वर्षी कोट्यवधीचे परकीय चलन मिळते द्राक्ष ,बेदाणा निर्मिती मध्ये हजारो लोकांना रोजगार मिळतो आहे त्यामुळे च द्राक्ष बागा यतदारणा शासनाने मदतीचा हात द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून लढई करावी लागेल असा इशारा देत आहोत यावेळी महेश खराडे संजय खोलखूंबे,  सुरेश वसगडे, शांतीनाथ लिंबेकाई, बाळासाहेब लिंबे काई,  संदीप शिरोटे, महेश जगताप ,संदीप बोरगाव, गोटू गारे  आदी  उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies