सांगलीत एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश ऐवजी आंदोलन!
पोलिसांनी परवानगी नाकारली!
उमेश पाटील-सांगली
सांगली बस स्थानक येथे, सांगली जिल्ह्यातील सर्व संपकरी एसटी कर्मचाऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार होता. पण पोलीस खात्याने परवानगी न दिल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना आम. सुधीर दादा गाडगीळ म्हणाले, एस टी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या प्रश्नाकडे ठाकरे सरकार पूर्ण दुर्लक्ष करत आहे. त्यांच्या या विलनीकरणाच्या मागणीचा प्रश्न सुटला नाही. तर आम्ही भाजपचे 106 आमदार येत्या विधानसभेच्या अधिवेशना मध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव ठेवून तो मंजूर करून घेऊ,माजी आम.नितीन राजे शिंदे म्हणाले, सध्या महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार या संप बाबत वेळ काढू पणा करत आहे. हा संप लांबणीवर टाकत आहे. या संपा मध्ये यापुढे कोणत्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्यास किंवा संपाच्या टेन्शन मुळे एखाद्या कर्मचारीच हृदयविकाराने निधन झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार महाआघाडी सरकार असेल. परीवहन मंत्र्या वर आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे म्हणाले हे सरकार एसटी कर्मचाऱ्यांना अजुन किती दिवस विटीस धरणार आहे. विलीनीकरणाची मागणी ताबडतोब मंजूर करण्यात यावी. जिल्ह्यातला भाजप कार्यकर्ते कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.
या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा अधिकारी सांगली यांना जिल्हा कार्यालयत जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
अनेक एसटी कर्मचाऱ्यांची भाषणे झाली. यामध्ये श्री विजय बापू चौगुले, शेरखान मुजावर, राजेश पाटील,, सुरेश माने, सौ मीनाताई जाधव, सौ. कोनेसागर, वैशाली जाधव,कृष्णा पाटील या कर्मचाऱ्यानी आपलं भाषणातून व्यथा मांडली. जोपर्यंत एसटी महामंडळाच्या शासनामध्ये विलीनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा संप मागे घेणार नाही असा ठाम निर्धार या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला;अविनाश मोहिते यांनी प्रस्तावना व आभार मानले
यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील, भाजपा प्रदेश सदस्य शिखरजी इनामदार, प्रदेश भाजपा सचिव पै. पृथ्वीराज भैय्या पवार, सुरेश बापू आवटी, विनायक सिंहासने, धीरज सूर्यवंशी, जगन्नाथ ठोकळे, सुब्राव मद्रासी, लक्ष्मण नवलाई, सौ स्वाती ताई शिंदे, सौ कल्पना कोळेकर, शो उर्मिला बेलवलकर, अमोल भाऊ पडळकर, प्रियानंद कांबळे, गौस पठाण, गजानन मोरे, बाळासाहेब पाटील,सौ माधुरी वसगडेकर, शोभाताई बिकट,, वैशाली पाटील, भाजपाचे पदाधिकारी, महिला मोर्चाच्या पदाधिकारी. त्याचबरोबर सांगली मिरज इस्लापूर, तासगाव कवठेमहांकाळ, पलूस,विटा, आटपाडी, शिराळा, या एसटी आगारातील बहुसंख्य कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.