कुंभार समाज सामाजिक संस्था रायगड ची सर्वसाधारण सभा संपन्न
योगेश खांडपेकर-कर्जत
भारत सरकार कडून कुंभार कारागिरांसाठी दिले जाणाऱ्या आर्टिजन कार्ड विषयी अतिशय सुरेख माहिती रमाकांत गोरे यांनी सर्व समाज बांधवांना दिली तर रायगड जिल्हा कुंभार समाज ही संघटना आता नवीन नावाने नोंदणीकृत करण्यात आली आहे यापुढे कुंभार समाज सामाजिक संस्था या नावाने ती ओळखली जाणार आहे या नोंदणीकृत संस्थेची ध्येय व उद्देश आणि नियमावली याची सविस्तर माहिती सर्व समाज बांधवांना युवक अध्यक्ष शरद कुंभार यांनी अतिशय छान व्यवस्थित सांगितली तसेच प्रत्येक तालुका अध्यक्षांना आर्टिजन कार्डचे फॉर्म व तहसीलदार कडून कुंभार कारागीर यांना दिले जाणारे ओळखपत्राचे फॉर्म देखील देण्यात आले त्यानंतर युवक कार्याध्यक्ष कोकण श्री किरण कुंभार यांनी महाड पूरग्रस्तांना समाज बांधवानी केलेल्या मदतीबद्दल सर्वांचे आभार मानले या सभेत अनेक समाज बांधवांनी आपले विचार मांडले समाजा मध्ये येणाऱ्या अडचणी याविषयी त्यांनी उपाय सुचवले समाज संघटन वाढविण्यासाठी अनेकांनी आपल्या अनमोल विचार या सभे समोर ठेवले सभे शेवटी समाजाचे अध्यक्ष अनंत महाडकर यांनीआपल्या अध्यक्षीय भाषणात महाळुंगे ग्रामस्थांचे मुरुड तालुक्याचे सभेच्या अतिशय सुंदर आयोजन बद्दल आभार मानले समाजामध्ये काम करणाऱ्या सर्व समाज बांधवांचे त्यांनी कौतुक केले संस्था नवीन नावाने नोंदणीकृत कशी झाली महाड पूरग्रस्तांना कशा पद्धतीने मदत सर्व तालुक्यातील पोहोचली संघटना कशी सक्षम करता येईल अशा अनेक विषयांवर त्यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या सभेसाठी जिल्हा कार्यकारिणीचे कैलास वाडेकर उपाध्यक्ष नंदकुमार चिरनेरकर उपाध्यक्ष नंदकुमार गोविलकर उपाध्यक्ष सुनील आंजर्लेकर खजिनदार अरुण बामनोलकर अनिल नागोठणेकर मधुकर कुंभार रामदास साळवी नंदकुमार पालवणकर कुंदन विनेरकर अक्षय बुरबाडकर बंटी बिरवाडकर वैजंयती उकरूळकर साधना पालवणकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा कार्य करण्याचे स्वागत तालुकाध्यक्ष रमेश नागावकर शैलेश रातवडकर नितीन राजपुरकर यांनी केले सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चौलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मिलिंद पालवणकर सर यांनी केले