मुरुडमध्ये विना मास्क आणि विना लसीकरण असलेल्या पर्यटकांवर तहसीलदारांचा रस्त्यावर उतरून कारवाईचा बडगा सुरू
ओमीक्रॉनचा धोका लक्षात घेता साळाव चेकपोस्टला पर्यटकांची कसून चौकशी!
दोन डोस,मास्क सक्तीचे
अमूलकुमार जैन-मुरुड
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताकरता सर्वत्र लगभग आहे.त्यातच मुंबईसह विविध शहरातून पर्यटकांची कोकणाला पहिली पसंती असते. रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड येथील पर्यटनस्थळे सध्या पर्यटकांनी गजबजलेली आहेत ,शिवाय वर्षा अखेरच्या दिवशी तर अधिकच पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहणार आहे, आत्तापासून अनेक पर्यटकांचा ओघ अलिबाग, मुरुड तालुक्याकडे येत आहेत.
25 ते 31 डिसेंबर अशा सुट्ट्या असल्याने मुरुड-जंजिरा कडे पर्यटक मोठया प्रमाणात इकडे येत असतात. ओमीक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता राज्य शासनाने आणि जिल्हाधिकारी रायगड यांनी दिलेल्या निर्देशानुसार पर्यटकांनी दोन डोस घेणे सक्तीचे आहे. विना लसीकरण असलेल्या पर्यटकांची अँटीजेन चाचणी करण्यात येत आहे.विना मास्क जे पर्यटक असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे
गोविंद वाकडे-तहसीलदार मुरुड
नव्याने आलेल्या ओमीक्रॉनचा धोका लक्षात घेता अलिबाग मुरुड ह्याना जोडणारा साळाव येथील चेकपोस्ट प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून पोलिस कर्मचारी तसेच वैद्यकीय कर्मचारी ,प्रशासकीय कर्मचारी चेकपोस्ट जवळ येणाऱ्या वाहनांना अडवून पर्यटकांचा कसून तपास करत सुरु आहे. येणाऱ्या पर्यटकांचे लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच पुढे सोडले जात आहे .अन्यथा जर डोस पूर्ण झाले नसतील तर त्याची कोरोना संदर्भात चाचणी केली जात आहे.तसेच विनामास्क वर देखील करवाई केली जात आहे. एकंदरीत ओमीक्रोनचा धोका लक्षात घेऊन प्रशासकीय यंत्रणेने सतर्कता बाळगली आहे.