रायगड निवृत्त पोलिसांचा वार्षिक मेळावा संपन्न
पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासहित वीस जणांनी केले रक्तदान
अमूलकुमार जैन-अलिबाग
व्यास पीठावर सोपानराव महांगडे,काशिनाथ कचरे,निवृत्त एसीपी,कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, माधव माळवे,निवृत्त अड,एस पी,ठाणे अध्यक्ष, रघुनाथ घरटे निवृत्त एसीपी सचिव ठाणे,सोपानराव जाधव निवृत्त एसीपी,अध्यक्ष पुणे,रायगड भूषण जयपाल पाटील,आपत्ती व्यवस्थापन तज्ञ,राजेंद्र कासार रायगड अध्यक्ष, सुरेश म्हात्रे उपाध्यक्ष हे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात येऊन त्याचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,सकाळी 8 वाजता पोलीस रुग्णालयात जिल्हा पोलीस अधीक्षक श्री,अशोक दुधे यांचे हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले होते यामध्ये इतक्या जणांनी रक्तदान केले. ते जिल्हा रुग्णालय रक्त पेढीत देण्यात आले.
रायगड संघटनाची कार्य प्रणाली,कामाच्या वाटचाली बद्दल राजेंद्र कासार यांनी प्रास्ताविक केले,रायगड भूषण जयपाल पाटील यांचा सन्मान प्रमुख पाहुणे यांचे हस्ते करण्यात आला त्या वेळी त्यानी घरातील विजेचा वापर करताना कशी सुरक्षा घ्यावी याचे मार्गदर्शन केले,यानंतर काशिनाथ कचरे,माधव माळवे,रघुनाथ घरटे,संपतराव जाधव यांनी आपली संघटना कश्या प्रकारे काम करते,व सभासदांना मदत करते,जुलै मध्ये निवृत्त झालेल्याना जुलै ची वेतन वाढ मिळावी,पोलिसांचा मुलांना नोकरीत आरक्षण ठेवावे, सेवा निवृत्तीनंतर हक्काचे घर मिळावे,तक्रार निवारण करण्यासाठी पोलिस महासंचालक कार्यलय सह सर्व राज्यात समधान हेल्प लाईन सुरू करावी अश्या मागण्या त्यानी मांडल्या.
यावेळी सभासदाच्या अडचणी ऐकून घेतल्या काहींचे निराकरण केले. या मेळाव्यास145 सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोशाध्यक्ष सुनील गोधळी यानी केले तर आभार नारायण चांदोरकर यांनी केले.