हिंदू लोहार समाजाच्या दिनदर्शिकेचे पनवेल येथे प्रकाशन
आदित्य दळवी-कर्जत
हिंदू लोहार समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पनवेल तळोजा येथे अध्यक्ष जनार्दन जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
कोरोना महामारीचे संकट असल्याकारणाने शासनाच्या नियमानुसार अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ही सभा श्री. हनुमान मंदिर तळोजे (कोळीवाडा) ता .पनवेल येथे संपन्न झाली. यावेळी समाजाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
माजी जि.प.सदस्य एकनाथ देशेकर,माजी सरपंच पाडुंरंग भागिवंत,माजी अध्यक्ष वसंत मोरे,किसन भागवत, संतोष जोशी ,मनोहर मणेर, राजेंद्र पायरे ,प्रकाश बोराडे , पद्माकर खंडागळे ,गणेश व्यापारी ,राहूल कोशे ,भरत व्यापारी , चंद्रकांत व्यापारी , दिलीप जोशी , यशवंत गायकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पायरे यांनी तर अहवाल वाचन व आभार प्रदर्शन संतोष जाधव यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंत मोरे यांनी केले.
कार्यक्रमासाठी रायगड , ठाणे, पालघर, मुंबई या ठिकाणाहून समाज बांधव - भगिनी उपस्थित होते ,