Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

म्हसळा नगरपंचायत निवडणुक : ३७ उमेदवाराचे भविष्य मतपेटीत बंद ; कडक पोलीस बंदोबस्त

 म्हसळा नगरपंचायत निवडणुक : ३७ उमेदवाराचे भविष्य मतपेटीत बंद ; कडक पोलीस बंदोबस्त

मतदानाची प्रक्रिया शांततेत  

             अरुण जंगम-म्हसळा

    

जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज मतदान शांततेत पार पडलं यासाठी निवडणूक यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला .

१७ प्रभाग असलेल्या म्हसळा नगर पंचायतीच्या या येवु झालेल्या १२ प्रभागा मध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांचे भाग्य ठरविणार आहे. आज १२ मतदान केंद्रावर निवडणूक झाली.

नगरपंचायतीच्या निवडणुकीची घाेषणा करण्यात आली. मात्र ओबीसी आरक्षणावरून नगर पंचायतीतील प्रत्येकी चार जागांची निवडणूक रद्द झाली. त्यामुळे आता  नगरपंचायतीत १ २जागांवर  निवडणूक झाली.

     निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर केंद्राजवळील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली ,बाजारपेठेत शुकशुकाट होता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असल्याने बाजारपेठेस छावणीचे स्वरूप आले होते. प्रत्येक केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 आज रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायत निवडणुकांसाठी आज मतदान झाले.  मागील काही दिवसांपासून निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला होता. सोमवारी प्रचार संपल्यानंतर आज मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती मतदाराना मतदानासाठी प्रोत्साहित करीत असताना नकळत प्रचार करीत होते.

         जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या  म्हसळा नगरपंचायतिच्या  १२ जागांसाठी साठी ३७ उमेदवारांचे भाग्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहे. 


म्हसळा जि. प प्राथमिक शाळा क्र १ , कन्या शाळा , उर्दु शाळा तसेच हायस्कुल येथील मतदान केंद्रावर सकाळी संथ गतीने सुरू झालेल्या मतदानाने दुपारी ३ वाजतानंतर गती घेतली. मतदान करण्याकरिता पुरुष-स्त्री मतदारांची लांब रांग लागल्याचे चित्र होते

           मंगळवारी मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. म्हसळा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस -शिवसेनेचे  आघाडी पॅनल तर भाजप व शेकाप यांच्यात थेट लढत झाली. 

 एकुण ३७ उमेदवार रिंगणात असुन १२ मतदान केंद्र असुन तर हक्क बजावणारे एकुण ४९७८ मनदार आहेत. दिवस अखेर ६८ . ५३% नागरीकानी आपला मतदाना हक्क बजावला .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies