सुधागड तालुक्यात कोरोनाचा शिरकाव;सोमवारी 2 कोरोना बाधित रुग्णांची नोंद
खबरदारी व काळजी घेण्याचे तहसीलदार दिलीप रायण्णावार यांचे आवाहन
विनोद भोईर-पाली-सुधागड
तालुक्यात आत्तापर्यंत कोरोनाचे 1730 रुग्ण झाले असून 1648 रुग्ण बरे झाले आहेत. आणि तब्बल 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्याने सर्व नागरिकांनी शासन नियमांचे पालन करून योग्य खबरदारी व काळजी घ्यावी. घाबरून जाऊ नये असे आवाहन यांनी तहसीलदार दिलीप रायण्णावार यांनी केले आहे.