Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत एकूण रु.94 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत एकूण रु.94 हजार 150 चा मुद्देमाल जप्त

         महाराष्ट्र मिरर टीम-



 दि.30 डिसेंबर व दि.31 डिसेंबर 2021 रोजी  राज्य उत्पादन शुल्क चे आयुक्त श्री. कांतीलाल उमाप  व  विभागीय उपायुक्त कोकण विभाग, ठाणे श्री.सुनिल चव्हाण यांच्या  आदेशानुसार रायगड राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षकआनंद पवार, दुय्यम निरीक्षक खालापूर,.रितेश खंडारे, दुय्यम निरीक्षक मानकर, दुय्यम निरीक्षक रोहा संजय  वाडेकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती रजनी नरहरी, जवान निमेश नाईक, जवान गणेश घुगे, महिला जवान श्रीमती अपर्णा पोकळे व  महिला जवान वर्षा दळवी वाहनचालक  नरेश गायकवाड  व पंच  या पथकाने गाव मौजे आंजरूंग,आदिवासी वाडी, ता.खालापूर  येथे दि.30 डिसेंबर 2021  रोजी गावठी हातभट्टी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर छापा टाकून एक  दुचाकी वाहन व  दि.  31 डिसेंबर 2021  रोजी  सकाळी  07:45 वाजता एक चारचाकी सेंट्रो  वाहन एमएच-04 बीक्यू 5958, दोनशे लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत आसताना  रोहा-चणेरा रस्त्यावर कुंभोशी गावाजवळ  पाठलाग करून  पकडले.

  या दोन्ही  दिवशी  केलेल्या कारवाई अंतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपशिल एकूण गुन्हे- 02, वारस -02, आरोपी- 02,वाहन - 1) होंडा ॲक्टिवा दुचाकी ( नंबर नसलेली), 2) सेंट्रो चार चाकी, एकूण हातभट्टी दारू- 260 लिटर, एकूण मुद्देमाल किंमत- रु. 94 हजार 150, असा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मुरुड विभागाचे निरीक्षक आनंद पवार यांनी दिली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies