Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सोलनपाडा धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता

 सोलनपाडा धरणाच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मान्यता

आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नांना यश

दिनेश हरपुडे/ज्ञानेश्वर बागडे

महाराष्ट्र मिरर टीम


कर्जत तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या सोलनपाडा धरणाच्या 3 कोटी 23 लाख रुपयांच्या दुरुस्ती कामाला जलसंवर्धन योजनेतून कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी प्रशासकीय मान्यता मिळवल्याने या परिसरातील लोकांनी आमदार महेंद्र थोरवे यांना धन्यवाद दिले आहेत.

कर्जत-खालापूर तालुक्यातील अनेक धरणे आणि धबधबे  मुंबई पुण्यातील लोकांच्या आकर्षण आहेत पावसाळ्यात येथे पर्यटकांची वर्दळ होत असते.त्यामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी प्राप्त होते ही बाब लक्षात घेऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी यात प्राधान्याने लक्ष घालून सोलनपाडा धरणाच्या दुरुस्तीचे काम तडीस नेले आहे.

2014 साली या धरणाचा बांध फुटल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीचे आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झालं होतं.तत्कालीन पाटबंधारे मंत्री यांनी या धरणाचे काम केले त्यांनतर काही वर्षांत या धरणाच्या सांडव्यातून पाणी गळती होऊ लागलं आणि माती काम दबले शिवाय या परिसरात पावसाळ्यात अतिवृष्टी होत असल्याने या परिसरातील लोकांना पुन्हा संकटाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून आमदार महेंद्र थोरवे यांनी इथल्या जनतेची मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री आणि जलसंधारण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून या धरणाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने या परिसरातील नागरिकांनी आमदार थोरवे यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies