तब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले वर्गमित्र
गेट टूगेदर
अमूलकुमार जैन-अलिबाग
स्वच्छंद पाटील व मीनाक्षी केणी यांच्या प्रयत्नांनी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला व त्याद्वारे ग्रूपमध्ये एक एक मित्र सामील होत गेला आणि दूरदूरपर्यंतचे सर्व मित्र एकत्र आले व एकमेकांना भेटण्याच्या ओढीने ३० जानेवारी २०२२ रोजी एकत्र भेटले. ज्या शाळेत १० वी पर्यंत शिक्षण घेतले त्याच शाळेत, त्याच वर्गात, त्याच बेंचवर, त्याच भिंतीकडे पाहून जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांचे सुख दुःख जाणून घेत आनंद व्यक्त करताना भारावून गेले. यावेळी ज्या मित्रांचा मृत्यू झाला किंवा जे कोरोनाचे शिकार झाले अशा सतीश पाटील, अविनाश खरसंबळे, ज्योती थळे, सुनील पाटील, संजय पाटील, किरण पाटील, राजश्री वावेकर, कोमल पाटील, संजीव खरसंबळे, मधुकर नाईक, मनीषा पाटील, प्रवीण पाटील या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. १० वी झाल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये कोणी शिक्षक, डॉक्टर, कॉन्ट्रॅक्टर मुंबई महानगरपालिका कर्मचारी बीएसटी, कोणी कॉलेजवर क्लार्क तर काहीजण ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, ग्रामसेवक, छोटे-मोठे उद्योजक अशा उच्च पदावर कार्यरत आहेत. यावेळी सर्वांनी आपल्या ३२ वर्षांनंतरच्या पहिल्या भेटीचा आनंद केक कापून एकमेकांना भरून व्यक्त केला. त्यानंतर गप्पा रंगल्या, नाच गाण्यातून आनंद व्यक्त करताना प्रत्येकाने आपापल्या घरातून बनवून आणलेले पदार्थ एकमेकांसोबत मिळून-मिसळून खाल्ले काहींनी आपले मनोगत व्यक्त केले तर काहींना मनोगत व्यक्त करताना भावना अनावर झाल्या यावेळी स्वच्छंद पाटील, जीवन पाटील, समीर कोठेकर, रमेश गोळे, उदय पाटील, आनंद पाटील, संतोष हुजरे, कौशिक पाटील, अरुण धुमाळ, सतीश पाटील, प्रवीण पाटील, सुनिता पाटील, रंजना निळकर, सुरेखा पाटील, मीनाक्षी केणी, माधुरी पाटील, कलावती पाटील, राजेंद्र शेलार, सुशील पाटील, विजया म्हात्रे, संतोषी म्हात्रे इत्यादी विद्यार्थी एकत्र जमले होते. शेवटी सर्वांनी वर्गात जाऊन वंदे मातरम हे गीत गायले. जड अंत:करणाने एकमेकांना निरोप दिला पुन्हा भेटण्यासाठी. यावेळी सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलचे चेअरमन व मुख्याध्यापक यांनी विशेष सहकार्य केले सर्वांचे आभार व सूत्रसंचालन जीवन पाटील यांनी केले.