Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेला जोरदार झटका

 शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस,मनसे आणि शेकापला जोरदार झटका

अनेक पदाधिकाऱ्यांनी केला आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश!

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


कर्जत खालापूर तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी शिवसेना पक्ष मजबूत करायला घेतला असून आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध पक्षातील डझनावरी नाहीतर शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेतल्याने कर्जत खालापूर मधील प्रस्थापित पक्षांना जोरदार झटका दिला आहे.हा पक्ष प्रवेश आगामी जिल्हापरिषद निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून कर्जत खालापूर मध्ये शिवसेना पक्षाचे पारडे जड झालं असल्याचं बोलल जातंय.

आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली व जिल्हा सल्लागार बबन पाटील यांच्या उपस्थितीत कर्जत व खालापूर तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व शेकापक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या पूजा प्रवीण थोरवे, प्रवीण थोरवे,माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पादीर, तसेच आदिवासी वाड्या वस्त्यांमधील अनेक नागरिकांनी, खालापूर तालुक्यातील महेश आगीवले, रितेश आगीवले व त्यांचे सहकारी तसेच मनसे माजी तालुका अध्यक्ष पप्पू शेळके व त्यांचे सहकारी यांनी आज शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेशामुळे मुळे भविष्यकाळात पक्ष संघटन मजबूत होणार असल्याचे मत आमदार महेंद्र यांनी या निमित्ताने व्यक्त केले. आपण आज पक्षात प्रवेश केल्यानंतर आपल्या नेहमी यथोचित सन्मान भविष्यकाळात केला जाईल असे आश्वासन सुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले.


याप्रसंगी जिल्हा सल्लागार बबन पाटील, जिल्हा सल्लागार भरत भगत, सहसंपर्क प्रमुख विजय पाटील, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, विधानसभा संघटक संतोष भोईर, संपर्क प्रमुख पंकज पाटील, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संघटक शिवराम बदे, सर्व उपतालुका प्रमुख , विभाग प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies