Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

माझा पुरस्कार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण : महापौर किशोरी पेडणेकर

माझा पुरस्कार हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अर्पण : महापौर किशोरी पेडणेकर                         

  महापौर किशोरी पेडणेकर यांचा नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गौरव !                                         

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची महापौरांकडे मागणी                                

पत्रकारांची नोंदणी करण्यासाठी शीतल करदेकर यांचा आग्रह                                            

महाराष्ट्र मिरर टीम-मुंबई


मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या दोन वर्षात कोरोनाविरोधात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व धाडसी नेतृत्वाबद्दल मुंबईच्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांच्या हस्ते शिवालय येथील एका छोटेखानी कौटुंबिक वातावरणात शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी महापौर किशोरी पेडणेकर या बोलत होत्या. एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर, अभिनेत्री अर्चना नेवरेकर, सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले, पदाधिकारी संदिप टक्के, स्वप्नील शिंदे, अनिल गुरव, महेश चौगुले, संतोष राजदेव, राजू येरुणकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.                                                                          दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तर मी महापौर पदाची जबाबदारी स्वीकारली. योगायोगाने कोविड १९ त्याचवेळी सुरु झाला आणि नियतीने आमच्यावर मुंबई महाराष्ट्राची जबाबदारी आली. बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्वभावाचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या ठायी असल्याने त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली कोविड वर आपण मात करु शकलो. मुंबईकरांनी मला संपूर्ण साथ दिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी वहिनींच्या मार्गदर्शनामुळे मला काम करणे शक्य झाले. त्यामुळे नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र यांनी जो माझा ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी यांच्या हस्ते सत्कार केला ते मी माझे भाग्य समजते आणि हा पुरस्कार मी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब यांना अर्पण करते. ओमायक्रॉनचा धोका कमी झाला असला तरी डेल्टा व्हायरस चा संसर्ग लक्षात घ्यावा लागेल. काळजी घ्या आणि सर्वच नियम काटेकोर पणे पाळा, असे माझे मुंबईकरांना आवाहन आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले.  योगेश वसंत त्रिवेदी यांनी आपल्या भाषणात नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्र या संस्थेने माझ्या हस्ते मुंबई च्या सव्वा ते दीड कोटी नागरिकांच्या प्रमुख, प्रथम नागरिक यांचा सन्मान करवून माझाच सन्मान केला आहे. पत्रकारितेत आपण ज्यांच्यामुळे आहोत ते आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभे रहावे आणि महापौर किशोरीताई यांनी यासाठी पुढाकार घ्यावा तसेच सर्वच पत्रकार संघटनांनी त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभे रहावे, असे आवाहन केले.                                                                                   
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स महाराष्ट्रच्या धडाकेबाज अध्यक्षा शीतल करदेकर यांनी महापौरांच्या कार्याचा गौरव करुन पत्रकारांना त्यांचे न्याय्य हक्क मिळावेत, त्यांची सरकार दरबारी योग्य नोंदणी करण्यात यावी, सन्मानाने सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कमी करण्यासाठी काय करता येईल ते पहावे, अशी आग्रही भूमिका मांडली.         
                                                                       सांस्कृतिक सामाजिक  कार्यकर्त्या  जॉय भोसले व अभिनेत्री अर्चना नेवरेकर   यांनी ही पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.                                           

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies