युवक युवतीचे लसीकरण म्हणजे सुरक्षा कवच':-जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर
अमूलकुमार जैन-अलिबाग
करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन या विषाणूचा वेगाने प्रसार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण आजपासून सुरू होत आहे.आजपासून सुरू होणारे युवक युवतीचे लसीकरण म्हणजे सुरक्षा कवच'आहे,असे म्हणण्यास हरकत नाही असे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अलिबाग येथील डोंगरे वाचनालय येथे युवक युवतीचे लसीकरण कार्यक्रमात केले.
यावेळी अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक,नगरसेवक अनिल चोपडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने,जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. सुधाकर मोरे ,निवासी बाह्य वैद्यकीय डॉ.गजानन गुंजकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप,अधिपरिसेविका जयश्री मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले की, शासनाने १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा डोस देण्याची तयारी केली आहे. लसीकरण मोहीम तीव्र पद्धतीने राबवून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे आव्हान पेलण्यासाठी जिल्हा माहिती प्रशासनाने कंबर कसली आहे. तर लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यात जवळपास एक लाख चाळीस हजार हुन अधिक लाभार्थी आहेत.येत्या दोन ते अडीच महिन्यात सर्व लाभार्थी याचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून त्या सर्वांना लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लसीचाच वापर करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे सर्व लाभार्थ्यांना शासकीय लसीकरण केंद्राच्या ठिकाणी मोफत लस देण्यात येईल. ज्या नागरीकांना खाजगी लसीकरण केंद्रावर लस घ्यायची असेल अशा नागरीकांसाठी केंद्र शासनाने पूर्वी घोषित केलेले किंमतीमध्ये लसीकरण करता येईल. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. लाभार्थीनी केंद्रावर जाऊन आपलं लसीकरण करून घ्यावे असेही आव्हान जिल्हाधिकारी कल्याणकर यांनी केले आहे.
मुलांच्या लसीकरणासाठी कोविन संकेतस्थळावर नावनोंदणी शनिवारपासून (१ जानेवारी) सुरू करण्यात आली आहे. तसेच प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. २००७ मध्ये किंवा त्यापूर्वी जन्मलेली सर्व मुले करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली असल्याची माहितीही देण्यात आली. त्याचप्रमाणे लाभार्थ्यांच्या लसीकरणासाठी वेगळी व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यावेळी केल्या.