तळा नगरपंचायतीच्या चारही प्रभागात प्रचाराला जोरदार सुरुवात.
किशोर पितळे-तळा
उर्वरित ४ जागाची निवडणूक येत्या१८ जानेवारी रोजी होत असल्याने या प्रभागात सद्या १४उमेदवार रिंगणात असून सेना भाजप,शेकाप,राष्ट्रवादी,अपक्ष आपले नशीब आजमावण्यासाठी शठ्ठ ठोकून उभे आहेत.या चारही प्रभागात उमेदवारांच्या घरोघरी मतदांच्या भेटीगाठीना जोर आलाअसून पक्षकार्यकर्ते प्रयत्नशील असताना दिसतआहेत.शिवसेनेने दिलेल्या वचननामापुर्ती झाली आहे. तर नियोजीत सर्व विकास कामे यापुढे देखील पुर्ण केली जातील अशा गाव बैठकीत केली जात आहे विविध पक्षाचे उमेदवार मिटींग घेऊन परीवर्तन घडून आणण्यासाठीआम्हालाच मत देऊन विजयी करा.तर एकिकडे मतदारांना अपेक्षीत विकास घडवून आणला जाईल सामाजिक समस्या देखील सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल.अशी अनेक प्रलोभने देऊन मतदाराना दाखवून आकर्षित केली जात आहेत.या प्रभागात काही उमेदवार नव्याने रिंगणात उतरले आहेत तर काही मुरब्बीअसून हि आपले नशीबाची परीक्षाघेतआहेत.या प्रभागातील मतदार सुज्ञ असूनही जिकडे ससा तिकडे पारधीअशी स्थिती होताना दिसत आहेत ता.१०रोजी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चार उमेदवारांनी काढता पाय घेतला असून१४ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत सद्यस्थितीत राजकीय हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे. भर थंडीच्यालाटेत राजकीय वातावरण प्रचाराचे झाले आहे,गुप्त अंतर्गत प्रचार सुरूआहे.ही निवडणूक चार प्रभागात लढविताना सर्वच पक्षांना येथे ताकद लावावी लागणार आहे .संपूर्ण तालुक्यासह तळावासीयांचे या चार लढती कडे लक्ष लागून राहिले आहे.