खालापूर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश....
महाराष्ट्र मिरर टीम-खालापूर
17 पैकी 8 जागा वर शिवसेना उमेदवार विजयी झाले तर शेकाप 7 जागेवर विजयी झाली तर राष्ट्रवादीला 2 जागेवर समाधान मानावे लागलं.
आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला यश संपादन करता आलं,या निवडणुकीत शिवसेनेच्या तीन जागा वाढल्या तर शेकापच्या जागा घटल्या आहेत.राष्ट्रवादीला फारसं काही यश संपादन करता आलं नाही तर भाजप शुन्यावरच राहिली.स्पष्ट बहुमत कोणाला नसल्याने कोण सत्तेत बसत हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.जिल्ह्यात शेकाप राष्ट्रवादी आघाडी आहे तर राज्यात शिवसेना राष्ट्रवादी युती आहे ,नगराध्यक्ष पदाची माळ कुठल्या पक्षाच्या गळ्यात पडते हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.