Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचा गाळ काढण्याच्या कामासाठी हातभार

सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानचा गाळ काढण्याच्या कामासाठी हातभार
नाम फाउंडेशन कडे दिला दहा हजार रुपयांचा धनादेश

          ओंकार रेळेकर-चिपळूण


शहरातील शिवनदीतील गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला असून या कामाचा शुभारंभ मंगळवारी ज्येष्ठ अभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान सावर्डे तर्फे गाळ काढण्याच्या उपक्रमासाठी १० हजार रुपयांचा धनादेश नाना पाटेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. याबद्दल या प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानतर्फे सामाजिक शैक्षणिक, कला, क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबवले जातात. दरम्यान, वाशिष्ठी, शिवनदीतील गाळ काढण्यासाठी चिपळूण बचाव समितीने नागरिकांच्या सहकार्याने ६ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले होते. तब्बल २८ दिवस उपोषण सुरू होते. या उपोषणाची शासन-प्रशासनाने दखल घेतली. तर दुसरीकडे नाम फाऊंडेशनने देखील शिवनदीतील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने यंत्रसामुग्री देखील मागविण्यात आल्या आहेत. तर मंगळवारी शिवनदीतील गाळ काढण्याच्या शुभारंभ ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. यानुसार शुभारंभ देखील झाला. तर या उपक्रमात आपला हातभार रहावा, यासाठी सावर्डे येथील शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानने पुढाकार घेत नाम फाऊंडेशनने नाना पाटेकर यांच्याकडे १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.  सदर वेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी डॉ.श्री.बी.एन.पाटील , प्रांतअधिकारी श्री. प्रविण पवार तहसीलदार मा.जयराज सुर्यवंशी, नाम फाऊंडेशनचे समीर जानवलकर, स्वप्नील चिले,  माजी सभापती पूजा निकम, संस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश सावर्डेकर, खजिनदार सुरेश बागवे, संजय घाग मनोज घाग, चंद्रशेखर राऊत, दिपक उघडे आदी सदस्य उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies