कशेळेत कर्जत प्रीमियर लीगचे आयोजन!
दिनेश हरपुडे-कर्जत
रायगड जिल्ह्याला टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख आहे त्यातच कर्जत मध्ये देखील अनेक नामवंत खेळाडू असून ते महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करत आहेत.कर्जत मध्ये अनेक प्रीमियर लीग होत असतात पण कर्जत प्रीमियर लीगमध्ये संपूर्ण कर्जत तालुक्यातील खेळाडूंचा यामध्ये समावेश असतो त्यामुळे कर्जत प्रीमियर लीगला एक वेगळे महत्व आहे.दरवर्षी कर्जत प्रीमियर लीग ही तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येत असते यंदाचा मान हा कशेळे येथील जय हनुमान क्रिकेट संघ यांना मिळाला असून या स्पर्धेचे आयोजन कशेळे गावाचे तरुण उद्योजक ऋषिकेश राणे यांनी केले आहे.ही स्पर्धा कशेळे एच पी पेट्रोल पंप मागील बाजूस स्वर्गवासी पांडुरंग राणे मैदानावर होणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांक साठी १ लाख ,द्वितीय ५० हजार तर तृतीय आणि चतुर्थ साठी २५ हजार चे बक्षिसे देण्यात येणार आहेत.तसेच उत्कृष्ट फंलदाज,गोलंदाज,क्षेत्ररक्षक यांना सायकल आणि मालिकावीर साठी मोटारायकलचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.