Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

काशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान

 काशीद येथे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद  ग्रामस्थांच्या मदतीने दिले वीस वर्षीय युवकास जीवदान

अमूलकुमार जैन-अलिबाग


 मुरूड तालुक्यातील काशीद समुद्रात बुडत असणाऱ्या वीस वर्षीय युवक सूरज लहू यादव यास काशीद येथे मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी काशीद  ग्रामस्थांच्या मदतीने जीवनदान दिले आहे.

काशीद समुद्र हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.काशीद समुद्र किनारी आज पुणे कात्रज येथून सूरज लहू यादव हा आपल्या मित्रमंडळी यांच्यासमवेत समुद्र पर्यटनासाठी आले होते.काशीद समुद्र बघितला की त्यात डुबकी मारण्याची प्रदीर्घ इच्छा ही पर्यटकांमध्ये असते.

सूरज लहू यादव हा समुद्र स्नानासाठी काशीद समुद्रात गेला मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पोहत पोहत दूरवर असणाऱ्या काशीद गाव मंदिरा जवळ निर्जनस्थळी समुद्रात काही माणसासोबत गेला.तेथे एक जण बुडत असल्याची माहिती घोडेस्वार सदीप बावधने  याने काशीद बीच पेट्रोलिंग ड्युटी करीत असतांना पोलीस हवालदार युवराज निकाले यांना दिली .

  पोलीस हवालदार युवराज निकाले यांनी वेळ न दडवता काशीद समुद्र किनारी असणारी रोहन खोपकर यांची बोट नंबर आरजेपी/आयव्ही /00094 भाग्यलक्ष्मी बोट चालक संजय वाघमारे व विशाल वाघमारे आणि आरजेपी /आयव्ही/00123 श्रेया बोट मालक नितेश नथुराम बोरे  आणि बोट चालक  प्रसाद महाडिक,आशु भोईर   बोटीतून जाऊंन बुडनाऱ्या          सूरज लहू यादव  यास   बोटीच्या साहाय्याने वाचुन काशीद बीच येथे आणले तेथे त्याचे वर प्रथमोपचार केले  सदर बुडणारी व्यक्तीच्या मित्र सत्येंन मोरे वय20 रा कात्रज पुणे  फोन न8767162607

 याचे कडे बुडणाऱ्या व्यक्तीची विचार पूस केली असता सूरज लहू यादव वय 20वर्ष रा कात्रज पुणे  अशी माहिती दिली.

काशीद समुद्र हा पर्यटकांना आकर्षित करीत असतो. त्याची भौगोलिक परिस्थिती ही सतत बदलत असते.काशीद समुद्राचे पाणी हे ओहटी वेळी परत जात असताना पायाखालची वाळू घेऊन जात असल्याने उभा असलेल्या पर्यटकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता असते. तरी समुद्र स्नानासाठी जाणाऱ्या सर्व पर्यटकांनी आपली आणि आपल्या कुटूंबाची काळजी घेणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies