Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

खा.सुनिल तटकारे यांच्या हस्ते पेण येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

खा.सुनिल तटकारे यांच्या हस्ते पेण येथे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

             अमूलकुमार जैन -अलिबाग


 पेण तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते राम-सिता कॉम्प्लेक्सच्या इमारतीमध्ये करण्यात आले.

रायगड जिल्हा तसेच पेण तालुक्यातील पूरपरिस्थितीमध्ये आपत्तीच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकांच्या पाठी राहिलो, शासनाची मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले, राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराधीन राहून लोक कल्याणकारी काम करण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे प्रतिपादन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

 यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद भगत, पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकुर,माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे,नगरसेविका वसुधा पाटील,प्रतिभा जाधव,उदय जवके, शहराध्यक्ष जितू ठाकुर, उपशहराध्यक्ष विशाल बाफना, कैलास जाधव, मंगेश नेने, गंगाधर पाटील, यशवंतदादा घासे,बंड्याशेठ, विकास म्हात्रे, विकास पाटील, विलास मनोरे,मीनाक्षी  पाटील,हमरापूर सरपंच प्रदीप म्हात्रे, अभि पाटील, संतोष अडसुळे,साजन पाटील,प्रसन्ना पोटे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयातून जनतेच्या समस्या वेळेत सोडवण्याचा प्रयत्न करण्यात यावा यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेचे बंधन पाळावे, लोकाभिमुख कामे करण्यात यावीत असे मार्गदर्शन त्यांनी यावेळी केले.खासदार सुनिल तटकरे यांनी विरोधकांचा समाचार घेताना मी जर थापे बाज असतो तर विधानसभेत ५ वेळा निवडून आलो नसतो, भाजपाच्या मोदी लाटेतही रायगड रत्नागिरी मतदार संघातून ४० हजार मतांनी खासदारकीला  लोकांनी मला निवडून दिले तर ज्यांना प्रश्नच कळत नाही ते प्रश्न काय सोडवणार, माझ्यावर टीका केल्या शिवाय विरोधकांचे नाव वर्तमानपत्रात कोण छापणार असे विरोधकांच्या टिकेला उत्तर देताना तटकरे म्हणाले.तर पुढच्या काळात या तालुक्याचा व शहराचा चेहरा मोहरा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून बदलण्यात येईल असे आश्वासन उपस्थितांना दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात इतर पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies