Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नरवीर तानाजी मालुसरे यांचा 24 व 25 फेब्रुवारी रोजी 352 वा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा संपन्न

 नरवीर तानाजी मालुसरे यांचा 24 व 25 फेब्रुवारी रोजी 352 वा शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा संपन्न

प्रकाश कदम-पोलादपूर

  तालुक्यातील उमरठ येथे तिथी प्रमाणे सुभेदार  नरवीर तानाजी मालुसरे याचा 352 वा  शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा 24 व 25 फेब्रुवारी 2020 रोजी उमरठ येथे नरवीर  तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट उमरठ याच्या वतीने साजरा करण्यात आला.

या वर्षीचा नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार पद्मश्री डॉ हिम्मतराव बावस्कर याना प्रदान करण्यात येणार आहे सकाळी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या मुर्तीस शिवकालीन खेडेगाव चे आप्पासाहेब उतेकर रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात पाली सातारा येथील मर्दानी खेळाचे उदय यादव यांच्या  मर्दानी खेळ संपन्न झाले त्यानंतर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पालखीचे आगमन नरवीर तानाजी व शेलार मामा समाधीच्या स्थळी झाले तालुक्यातील प्राथमिक शाळांनी चित्र र्थाद्वारे संपूर्ण तालुक्याचा इतिहास मांडला नरवीर एडवेंचर वरच रेस्क्यू टीम त्यांनी आपत्ती व्यवस्थापन मधील विठ्ठलाचे दर्शन घडवले

       रायगड जिल्हा परिषद अलिबाग ,पंचायत समिती पोलादपूर व नरवीर  तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरिटेबल टेस्ट उमरठ  याच्या संयुक्त विद्यमाने सुभेदार  नरवीर तानाजी मालुसरे याचा 352 वा  शौर्य दिन व पुण्यतिथी सोहळा 24 व 25 फेब्रुवारी 2020 रोजी उमरठ येथे साजरा करण्यात आला यावेळी पालकमंत्री ना आदिती तटकरे , आ भरतशेठ गोगावले , जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी , खासदार सुनीलजी तटकरे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर , यांच्यासह जिल्ह्यातील आमदार ,राजीप सदस्य  , चंद्रकांत कळंबे ,पंचायत समिती सभापती  श्रीमती नंदा चांदे , यांच्यासह महाड प्राताधिकारी प्रतिमा पुदलवाड , तहसीलदार दीप्ती देसाई , गटविकास अधिकारी धनंजय जगताप आदी च्या उपस्थिती मध्ये या वर्षीच्या नरवीर तानाजी मालुसरे शौर्य सेवा पुरस्कार पद्मश्री डॉ हिम्मतराव बावस्कर याना प्रदान करण्यात येणार आहे   24 फेब्रुवारी 22 रोजी नरवीर तानाजी मालुसरे याच्या पुतळ्यास पूजन करून कार्यक्रम ची सुरवात करण्यात येणार आहे या नंतर ध्वजारोहण ,पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे दुपारी 3 वाजता महिला सक्षमीकरण अंतर्गत हळदी कुंकू व मार्गदर्शन या वेळी माजी जिप सदस्य सुषमा गोगावले ,पोलादपूर नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सोनाली गायकवाड उपस्थित राहणार आहेत सायंकाळी 4वाजता तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा ,तर 5 वाजता आपत्ती व्यवस्थान बाबत प्रशिक्षण व मार्गदर्शन महेश सानप , दत्तात्रेय तरे ,अंकिता वाघ हे करणार आहेत तर रात्री महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे 

     25 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता नरवीर तानाजी मालुसरे व शेलारमामा याच्या समाधी स्थळाला महाअभिषेक , पूजा ,ध्वजारोहण पुष्पहार अर्पण आदी कार्यक्रम होणार आहेत या नंतर पालखी मिरवणूक ,मैदानी खेळ आदी उपक्रम सादर करण्यात येणार आहेत या नंतर नरवीर तानाजी मालुसरे रेस्केयु चे उद्घाटन ,मान्यवरांचा सत्कार सोहळा , मदत कार्य करणाऱ्या मान्यवरचा सत्कार , कबड्डी स्पर्धेचे विजेते याचा सोहळा व मशाल महोत्सव आदी भरगच्च कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies