Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

ढाक गडावरून तोल जाऊन औरंगाबादच्या प्रतीक आवळे ट्रेकरचा दुर्दैवी अंत

  ढाक गडावरून तोल जाऊन औरंगाबादच्या प्रतीक आवळे ट्रेकरचा दुर्दैवी अंत

यशवंती हायकर्सने ग्रामस्थांच्या मदतीने खोल दरीतून मृतदेह काढला बाहेर

ज्ञानेश्वर बागडे-कर्जत

ढाक बहिरी हा कर्जत व मावळ तालुक्याला लागलेला सुळका त्यावर काल सकाळी 5 जण प्रतीक आवळे, पंकज गावदाडे, सुजित लहाने ,अभिषेक शेजुळ, सागर जैस्वाल औरंगाबादहुन हे 5 जण ट्रेक साठी गेले होते. त्यातील प्रतीक आवळे ह्याचा तोल खाली पडून त्याचा दुर्दैवी अंत झाला. 

काल ही घटना दुपारी 3.30 च्या सुमारास घडली. तुषार महाडिक व भारत रायकर हे ट्रेकर्स यांनी हे पाहता मयत प्रतीक आवळे व 4 जण याना व्यवस्थित जागेवर घेतले. 

सादर rescue चा कॉल येताच संतोष दगडे व टीम कर्जत  व  स्थानिक गावकरी लगेच पोहोचले . तसेच यशवंती हायकर्स खोपोलीची टीम साहित्यासह ढाकच्या डोंगरावर पोहोचले. 

साधारणतः सायंकाळी 6.30 वाजल्यापासून मयत प्रतीक व त्याचे सहकारी याना कर्जत मधील सांडशी गावाच्या वाटेने खाली आणानेचे प्रयत्न चालू झाले. 

काळोख आणि पायवाट तसेच डोंगर उतार व कड्याच्या बाजूची अरुंद जागा यातून सर्व ट्रेकर्स टीम व गावकरी यांनी मयत प्रतीक व इतर 4 मित्रांना खाली सांडशी गावात रात्री 3.30 वाजता पोहोचवले  व तिथून कर्जतला पोहोचवण्यात आले.कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी प्रतिकचा मृतदेह नेण्यात आला असून पोलिसांचा पंचनामा सुरू आहे,प्रतिकचे नातेवाईक कर्जतला पोहोचले आहेत.

मदतकर्त्यांची नावे

सांडशी गाव

ऋषिकेश कदम, किरण शिर्के ,संकेत कदम ,संदेश शिर्के मंगेश तुरडे ,रोशन पेडणेकर ,हरी ठोंबरे ,लखन जाधव ,गणेश मुकणे ,गणेश सोमनाथ

संतोष दगडे व टीम कर्जत

अभि दगडे,कैलास,सौरभ

यशवंती हायकर्स, खोपोली

पद्माकर गायकवाड,महेंद्र भंडारे,अरविंद पाटील,अभिजित घरत,सौरभ रावल,भावेश शिर्के,राजू मोरे,रुपेश जाधव,प्रणित गावंड,संदीप पाटील

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies