Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

सागरी महामार्गामुळे कोकणचे पर्यटन खऱ्या अर्थाने बदलेल :- पालकमंत्री आदिती तटकरे

 सागरी महामार्गामुळे कोकणचे पर्यटन खऱ्या अर्थाने बदलेल :- पालकमंत्री आदिती तटकरे

दिवेआगर येथे एमटीडीसी कार्यशाळेचे उदघाटन

 विजय गिरी -श्रीवर्धन


 सागरी महामार्गाचे पूर्णत्वानंतर कोकणची पर्यटनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलेल कोकणचे पर्यटन वेगळ्या उंचीवर असेल तर शासनाच्या वतीने पर्यटन व्यवसायाला अधिक चालना मिळण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत व जबाबदार पर्यटन काय असते याचे उदाहरण रायगडकरांनी नेहमीच दाखवून दिले आहे , असे प्रतिपादन रायगड पालकमंत्री तथा पर्यटन, खनिकर्म राज्यमंत्री ना. आदिती तटकरे यांनी केले , दिवेआगर येथील कुणबी समाज मंदिर येथे महाराष्ट्र पर्यटन व विकास महामंडळाच्या तीन दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन तसेच प्रमाणपत्र वाटप शिबराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. 

   रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायामध्ये निवास व न्याहारी व्यवस्था करणाऱ्या व्यवसायिकांसाठी महाराष्ट्र  पर्यटन व विकास महामंडळ व दिवेआगर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नोंदणी करणे व प्रमाणपत्र वाटप शिबिर व कार्यशाळेचे आयोजन दिवेआगर येथील कुणबी समाज हॉल येथे करण्यात आले आहे हे शिबीर तीन दिवस चालणार असून या शिबिराचे उदघाटन पालकमंत्री तथा पर्यटन राज्यमंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच उदय बापट, एमटीडीसी महाव्यवस्थापकीय अधिकारी दिनेश कांबळे, 

उपसरपंच चोगले, दिवेआगर पर्यटन व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष लाला जोशी, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, श्रीवर्धन  उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, कांदळवन समिती सदस्य सिद्धेश कोसबे, हरिहरेश्वर सरपंच अमित खोत, बोर्लीपंचतन माजी उपसरपंच मंदार तोडणकर,  राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सुचिन किर, पर्यटन व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आपल्या मनोगतामध्ये अदिती तटकरे म्हणाल्या की, आपल्या भागात येणाऱ्या पर्यटकांचे वास्तव्य जास्तीत जास्त कसे वाढविण्यासाठी आपल्याला विविध कल्पक योजना राबवायच्या असून यामध्ये कांदळवन सफारी, समुद्र किनाऱ्यावर वॉटर स्पोर्ट या जोडीला आता दिवेआगर येथे पर्यटन मार्केट साठी शासनाने 2.50 कोटी निधी तसेच, कासव संवर्धनासाठी 5 कोटी निधी मंजूर केला आहे या सोबत सेल्फी पॉईंट तसेच इतर सुशोभीकरण करण्याचे काम भविष्यामध्ये होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे त्या म्हणाल्या तसेच रेवस रेड्डी  सागरी महामार्ग हा याच भागातून जाणार असल्याने या महामार्गामध्ये येणारे खाडी पूल हे आयकॉनिक असावेत याची मागणी आपली आहे त्यामुळे पर्यटकांसाठी ते आकर्षण ठरेल व महामार्गामध्ये येणारे 93 पर्यटन स्थळांची कनेक्टीव्हिटी या महामार्गाला मिळाल्याने संपूर्ण कोकणचे पर्यटनाच्या बाबतीतील चेहरा मोहरा अजून सकारात्मक पद्धतीने बदलेल यातुन स्थानिक व्यवसायिकांना मोठा फायदा निश्चित होईल असेही ते म्हणाल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी नोंदणी पूर्ण झालेल्या व्यवसायिकांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र वाटप आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies