रानटी डुक्करची शिकार करणारे दोन आरोपी गजाआड
महाराष्ट्र मिरर टीम-श्रीवर्धन
श्रीवर्धन पोलिसांनी अनधिकृतपणे रानटी डुकराची शिकार करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी श्रीवर्धन पोलिसांनी गु र न ०५/२०२२ भारताचा हत्यार अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ सह वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम २ (१६), ९ ५०, ५१ प्रमाणे गुन्हा दाखल केला.
मुंबई कांदिवली येथे राहणारे चार्ली अंथॉनी वैती वय ४० ग्लेन डोमीनीक वैती वय ३९ या आरोपीना अटक केली असून आरोपीना न्यायालयात हजर केली असता दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदर आरोपींकडून एक दोन नळी बारा बोर बंदूक पंधरा काडतुसे एक झायलो कार ३५ किलो रानटी डुकराचे मटण असे एकूण चार लाख बावन्न हजार दोनशे बॅनव रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आल्हाट करत आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यामुळे वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या शौकीनांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.