तलवारवाडी येथे कुत्र्यांच्या पिल्लांना विषारी औषध देऊन केली हत्या
अमूलकुमार जैन-अलिबाग
श्रीमती रोझलीन परेरा यांचे मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे बंगला असून या बंगल्यात स्वप्नील सुभाष सांगळे केअरटेकर म्हणून पार्ट टाईम काम करीत आहेत.रोझलीन परेरा हे प्राणीमित्र असल्याने सांगळे हे त्यांच्या सांगण्याप्रमाणे नांदगाव ते काशीद भागातील कुत्र्यांना खाद्यपदार्थ देण्याचे काम करीत असतात. सांगळे हे काशीद ग्रामपंचायत हद्दीतील मौजे तलवारवाडी जवळील दर्गा येथे दिनांक ५फेब्रुवारी२०२२ रोजी नेहमीप्रमाणे कुत्र्यांच्या पिल्लांना जेवण देण्याकरिता गेले असता कुत्र्यांची पिल्ले ही झाडीझुडपात मयत स्थितीत मिळून आली.सदर पिल्लना कोणी तरी अज्ञात इसमाने विषारी औषध देऊन हत्या केली आहे.याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रोहेकर करीत आहेत