Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

गुढी पाडवा

 गुढीपाडवा

मिलिंदा पवार -सातारा

गुढीपाडवा हिंदू नववर्षाची सुरुवात चैत्र मासारंभ शालिवाहन शकाचा प्रारंभ साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असे गुढीपाडव्या बद्दल सांगितले जाते ब्रम्हदेवाने ह्या दिवशी विश्वाची निर्मिती केली. दधिची ऋषीच्या अस्थी चा वापर करून इंद्राने वृत्रासुराचा वध केला. रावणावर विजय मिळवून प्रभू रामचंद्र परत आले ते याच दिवशी या सगळ्या घटनांना भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व राहिले. निसर्गातील बदलांना सुरुवात होते ते पाडव्याच्या काळात. शुष्क झालेली वनसंपदा बहरते, पानगळ झालेल्या झाडांना हिरवी पाने येतात, ती याच काळात. कोवळ्या लिंबाच्या झाडांची पाने फुले खाऊन चटणी करावी आणि ती खाल्ली म्हणजे वर्षभर कोणतेही आजार होत नाहीत हा आयुर्वेदीय संदर्भ सापडतो तो याच दिवसांवरच. अनेक संत महात्म्यांचे अभंग साहित्यकृतीवर ही गुढी पाडव्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो कारण हा दिवस मुळात असतो चैतन्याचा, उत्साहाचा, आनंदाचा. संतचोखामेळा म्हणूनच म्हणतात टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीची याचाच अर्थ पंढरीला जाताना होणारा आनंद हा चोखामेळा यांच्या गुढीपाडव्या सारखाच वाटतो.

गुढीपाडवा हा सण सामाजिक एकोपा कायम राहावा हेच सांगतो कारण सगळ्यांनी गुढी उभारून स्वागत केले पाहिजे याचा अर्थ आपण एकट्याने करण्याचे काम नाही. समाजात कोणताही भेदभाव नाही सर्वजण समान आहे समानतेच्या पातळीवर असे उत्सव साजरे करीत असतो . गुढी हे त्याचे झाले प्रतीक. पाडव्यापासून नवीन व्यवसायाच्या आरंभ करणारे अनेक जण असतात नवीन  वस्तूंची खरेदी, नवीन वाहन, वास्तुप्रवेश असे कार्यक्रम या दिवशी केले जातात अलीकडच्या काळात महाराष्ट्रातील अनेक शहरात नववर्षाच्या मिरवणुका काढून हा सण साजरा केला जातो या मिरवणुकात  युवकांचा असणारा उत्साह, आकर्षक वेशभूषा असणारा युवती, वेगवेगळ्या खेळांचे प्रदर्शन समाजात असणाऱ्या विविध संघटनांचा सहभाग एकोप्याचे दर्शन घडवितात चैत्र महिना म्हणजे तसे म्हटले तर पावसाळ्याला राहतात फक्त दोन महिने या दोन महिन्यांच्या काळात तयारी करावयाची ती खरीप हंगामाची मशागत करणे बी बियाणे खतांची खरेदी शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचे दुरुस्ती ही कामे या कालावधीत केले जातात गेल्या तीन-चार वर्षांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कमी पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे यंदा तर त्याची तीव्रता अधिक आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरसुरू केलेल्या सर्व कामांना यश मिळेल हीच अपेक्षा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies