चिपळूण नागरीच्या कर्मचा-यांच्या ३० एप्रिल व १ मे रोजी शाखातंर्गत क्रिकेट स्पर्धा
ओंकार रेळेकर -चिपळूण
कर्मचा-याना प्रोत्साहीत करण्यासाठी संस्थेमार्फत चांगले वेतन दिले जात असतानाच त्यांच्या
चांगल्या कामाचे कौतुक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात असताना त्यामध्ये
सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन शाखाधिकारी, सर्वोत्कृष्ठ काम करणारे तीन वसुली कर्मचारी
यांचा खास यथोचित सत्कार करणे, सर्व कर्मचा-यांना चांगल्या कामाबाबत वर्षात एकुण चार
पगार भेट म्हणुन देण्यात येत असतात. अशा पध्दतीने त्यांचे कौतुक करीत असतानाच
आपल्याला सिध्द करण्यासाठी सांघीक पध्दतीने क्रिडा स्पर्धात सामिल होऊन यशस्वी होणे
साठी कसोशीने प्रयत्न करुन यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी यासाठी
क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करत असते. दि. ३० एप्रिल व १ मे २०२२ या कालावधीत संस्थेच्या
सात विभागाच्या शाखांतर्गत कर्मचा-यांच्या आठ संघामध्ये क्रिकेट स्पर्धांचे तसेच कर्मचारी संघ
विरुद्ध संचालक मंडळ संघ अशा लक्षवेधी सामन्याचे दि. ०१ मे २०२२ रोजी आयोजन करणेत
आले आहे. या स्पर्धा क्रिकेट क्षेत्रातील क्रिडापटुना व क्रिकेटची आवड असणा-या क्रिडा
रसिकांना एक प्रकारचे आकर्षण असेल. या स्पर्धा चिपळूण नगरपालीकेच्या पवन
तलावावरील स्टेडीअम वर ३० एप्रिल व १ मे रोजी संध्याकाळी ठीक ०५.०० वाजता सुरु
होणार असुन रात्री १० वाजेपर्यंत चालणार आहेत. विजेत्या संघाला व उपविजेता संघाला
आकर्षिक शिल्ड देण्यात येणार आहे. संस्थेच्या नाविन्यपुर्ण उपक्रमास क्रिडा रसिकांनी व
संस्थेच्या चाहत्यांनी उपस्थित राहुन कर्मचा-यांना प्रोत्साहित करावे असे आवाहन चिपळूण
नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाने केले आहे.