घोणसे घाटात अपघाताची मालिका सुरूच
सिमेंट वाहतूक ट्रकचा अपघात चालक गंभीर, एकाच जागी महिन्याभरात तीन अपघात
महाराष्ट्र मिरर टीम -म्हसळा
घोणसे घाटात एकाच जागी महिन्याभरात तीन अपघात होऊन मोठ्या प्रमाणात मनुष्य व वित्त हानी झाली आहे.अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटाचा नव्याने पर्यायी मार्ग तयार झाल्या नंतर अधुन मधून काही किरकोळ अपघात वगळता मोठ्या प्रमाणात मनुष्य व वित्तहानी टलली होती मात्र पुन्हा या घाटात गाड्यांना अपघात होऊन आणि वित्तहानी थांबण्याचा नाव घेत नसुन घाटातील जुना अपघाती पवनक्षेत्राची जागा बदली होऊन आता नवीन आणि त्याहुन अधिक अवघड उतार वळणाचा पवनक्षेत्र निर्माण झाला आहे.
दिनांक ८ मे रोजी घोणसे घाटात प्राजक्ता ट्रॅव्हल्स ७० फुट दरीत कोसळत अपघात होऊन तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता त्यात ३४ प्रवाशी जखमी तर उपचाादरम्यान एक ते दोन प्रवाशी दगावले असल्याचे समजते.दुसऱ्याच दिवशी त्याच जागी जीपगाडी धडकली होती तर आज दिनांक २४ मे २०२२ रोजी सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकचा त्याच जागी जोरदार अपघात होऊन या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.अपघात होताच म्हसळयातील कर्तव्यदक्ष, नागरिक,पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचे कॅबीनमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर कादून ग्रामीणरुग्णायात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी माणगाव व मुंबई येथे हलविण्यात आले आहे.
अपघात ठिकाणी रस्ता विकासकाने गाडी दरीत कोसळू नये म्हणुन आणि अपघाती गाडीला अडथळा येण्यासाठी मातीचा ढिगारा केला आहे.याच मातीच्या ढिगाऱ्यामुळे सिमेंट वाहतूक करणारा अपघाती ट्रक धडकून दरीत कोसळता कोसळता अडला असल्याचे घटनास्थळी निदर्शनास येत आहे.