Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

लाडक्या श्वानाचे निधन

 लाडक्या श्वानाचे निधन

साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप

ज्ञानेश्र्वर बागडे - कर्जत

रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे राहणारे भगवान चंचे हे त्यांच्या प्राणी प्रेमासाठी ओळखले जातात. पर्यटनाच्या व्यवसायात असलेले चंचे यांनी त्यांच्या नेरळ इथल्या फार्म हाउस मध्ये  म्हशी, कुत्रे, गाई ,घोड्यासह अन्य प्राणी पाळले आहे. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून ते या  मुक्या जनावरांची सेवा करतात, त्यांची काळजी घेतात. प्राण्यांच्या सहवासात आनंद मानणाऱ्या चंचे कुटुंबीय सध्या दुखात आहेत. त्यांचा आवडता जॅक नावाच्या कुत्र्याचे निधन झाले असून कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे त्यांनी मरणोत्तर सर्व धार्मिक विधी पुर्ण करुन एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. 

चंचे कुटुंबीय आपल्या मुलाप्रमाणे या प्राण्यांचे वाढदिवसही न चुकता आणि अनोख्या पध्दतीने साजरे करतात. वाढदिवसाला ते आपल्या मित्रपरीवाराला बोलावतात, त्यांना पार्टीही देतात. प्राण्यांचे लाड पुरवण्यासाठी  त्यांचे आवडते चॉकलेट्स , खाद्यपदार्थ ते प्रसंगी परदेशातूनही मागवत असतात.

काही दिवसापासून भगवान चंचे यांच्या घरी शोककळा पसरली आहे. त्यांचा आवडता असलेल्या जॅक नावाच्या कुत्र्याचे निधन झाले. अनेक दिवसापासून जॅक आजारी होता. जॅकला वाचवण्यासाठी चंचे यांनी खूप प्रयत्न केले. त्याला कल्याणचे हॉस्पिटलमध्ये नेले,मात्र जॅक वाचू शकला नाही.  जॅकचे निधन झाल्यावर भगवान चंचे यांनी त्याच्यावर विधीवत अंत्यसंस्कार केले. जॅकचा तिसरा दिवसही चंचे कुटुंबानी पाळला. जॅकच्या फोटोसमोर त्यांनी त्याची आवडती फळे, चॉकलेट्स ठेवली गेली. जॅकची तेरावे करण्याचा निर्णय चंचे कुटुंबानी घेतला आहे. आवडत्या जॅकच्या स्मृती तेवत राहाव्या यासाठी समाधी बांधण्याचे कामही त्यांनी सुरु केले आहे. या समाधीच्या माध्यमातून आमचा आवडता जॅक माझ्या डोळ्यासमोर राहील असं चंचे यांनी बोलताना सांगीतले.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies