'के.एम.सी. महाविद्यालय आता प्रगतशील शहरातील महाविद्यालयांच्या स्पर्धेत.
'नॅक' समितीकडून शिक्कामोर्तब
गुरुनाथ साठेलकर- खोपोली
सन २०१६-१७ ते २०२१-२२ या पाच वर्षाच्या कालावधीतील शैक्षणिक, संशोधनपर व सर्वांगीण प्रगतीचा अहवाल महाविद्यालयांने संस्थेला जमा केला होता. त्याच्या आधारे 'नॅक' तज्ज्ञ समितीने नुकतीच महाविद्यालयाला भेट देऊन त्यातील तथ्यांची पडताळणी आणि मूल्यमापन केले असतात त्यांना महाविद्यालयाला पुनर्मूल्यांकनांसह उत्तम श्रेणी देणे क्रमप्राप्त ठरले आहे महाविद्यालयाच्या शैक्षणिक, संशोधनपर व विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने करत असलेल्या कार्याची नोंद 'नॅक'ने घेत असताना आजतगायात दर्जेदारीत ठेवलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक केले आहे.
१९७९ साली सुरू झालेल्या के.एम.सी. महाविद्यालयाच्या ४३ वर्षाच्या वाटचालीत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने शैक्षणिक संशोधनपर प्रगतीचा आलेख उंचावतच गेलेला आहे. कला,विज्ञान, वाणिज्य त्याच सोबत संगणक शास्त्र पदवी तसेच पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. पर्यंत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व संशोधनपर संधी उपलब्ध करून देण्यात महाविद्यालय यशस्वी झाले आहे. शैक्षणिक वाटचाली सोबत कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे सर्वच घटक प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची आवड निर्माण व्हावी आणि त्यासाठी संधी मिळावी त्यातून विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करता यावकडे महाविद्यालय प्रशासन काटेकोरपणे लक्ष देत असते.
शिक्षणासोबत सर्वच क्षेत्रातल्या मूल्यांचे संस्कार करताना विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कैकपटीने वाढल्याचा विश्र्वास व्यक्त केला जात आहे. के एम सी कॉलेजच्या या उत्तुंग कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष संतोष जंगम, उपाध्यक्ष श्संजय पाटील, कार्यवाह किशोर पाटील, माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ सदस्य दत्ताजीराव मसुरकर, महाविद्यालयाचे उपाध्यक्ष, राजेश अभाणी, विविध शालेय समित्यांचे अध्यक्ष तथा कार्यकारणी आजी व माजी सदस्य यांनी प्राचार्य, डॉ.प्रताप पाटील, डाॅ.महेश खानविलकर, प्रा.राजेंद्र कोकणे, समन्वयक डाॅ.दीपक गायकवाड, सर्व शाखा व विभाग प्रमुख, प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी -विद्यार्थिनींचे या कामगिरीबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाच्या या कार्यकर्तृत्वाबद्दल खोपोलीतील नागरिक, पालक, पत्रकार, माजी विद्यार्थी सर्वच स्तरातून महाविद्यालयाचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
'नॅक' कडून महाविद्यालयाला मिळालेले मानांकन म्हणजे सर्वांनी घेतलेल्या कष्टांचे चीज आहे, या गौरवाबद्दल मी सर्वांचे अभिनंदन आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा."
संतोष जंगम
अध्यक्ष, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ.
"अनेक अडचणी असूनही संस्थेची सर्व कार्यकारिणी व मा.प्राचार्य, नॅक समन्वयक, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक- प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवकवृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी घेतलेल्या अथक प्रयत्नामुळे महाविद्यालयाला हा नावलौकिक मिळाला आहे. या यशाबद्दल सर्वांचे मी अभिनंदन करतो."किशोर पाटील,
कार्यवाह, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ.