गौरा वीर महाराष्ट्राचा आणि वीरांगना महाराष्ट्राची सीज़न ३- २०२२ सौंदर्य स्पर्धेचा सोहळा बोट क्लब पुणे येथे मोठ्या दिमाखात संपन्न
देवरुखचा सुपुत्र शाहिद शेख यांचा गौरव
ओंकार रेळेकर- चिपळूण
या वेळी मीडीया पार्टनर म्हणून सागर पाटील (एस.पी.नाइन.) यांनी सहकार्य केले .संपूर्ण महाराष्टातील एकूण ५५ स्पर्धकांनी यात सहभाग नोंदविला होता .मि.वर्ल्ड रोहित खंडेलवाल , अभिनेता मिलिंद गुणाजी , सचिन दनाय ( ब्रँड अंबासडर ) , डॉ.दिलीप बोरावके ,गौरी नाईक , प्राची भावसार , चैतन्य गोखले व चैताली नेहेते यांनी परीक्षकांचे काम केले तसेच भारत सुरती ( जेडब्लू ) यांनी मेन्स डिझाइनर पार्टनर व मि.बेनविन कूटीनो ( कॅलीस्टा बुटिक ) यांनी लेडीज डिज़ाइनर पार्टनर म्हणून सहकार्य केले. मेकअप पार्टनर म्हणून अम्रुता पाटील (एल.टी.ए.स्कूल ऑफ ब्यूटी ) व सुप्रिया शिंदे ( सुप्रिया मेकओव्हर ) तसेच महेश सोनी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले या प्रसंगी विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या व्यक्तींना गौरा यशश्री पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले आयोजक गौरी नाईक व जयंत पाटील ( गौरा फॅशन क्लब ) यांनी सर्व प्रायोजकांचे , परीक्षकांचे व कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे व कार्यक्रम यशस्वीते साठी सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले