राज्यात कुठलेही संकट आले तर सर्वप्रथम मदतीसाठी धावून येणारा शिवसैनिकच असतो :- खासदार राजन विचारे
अमूलकुमार जैन-अलिबाग
यावेळी व्यासपीठावर यावेळी अलिबाग मुरूडचे आमदार महेंद्र दळवी, जि. प. चे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे,कामगार नेते दिपक रानवडे, संपर्क प्रमुख टावरी,अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी,शहर प्रमुख संदीप पालकर, जिल्हा महिला संघटक दिपश्री पोटफोडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना खासदार राजन विचारे यांनी सांगितले,राज्यात महा विकासआघाडी सरकार स्थापन होत आपले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर आलेले कोरोना व नैसर्गिक आपत्ती या संकटांचा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने मुकाबला केला. यामुळेच देशात 5 टॉपमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संस्थानीं गौरविले असल्यानेच राज्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेना प्रणित महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी केले.याकाळात मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुखांनी केलेल्या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेत भारतातही ते अव्वल राहिले. स्थानिक पातळीवर तुमच्या व्यथा, अडचणी या जाणून घेतल्या आहेत. शिवसेनेने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली पाहिजे असे सांगितले.त्याची दखल भविष्यात नक्कीच घेत त्यामध्ये बदल होईल. यासोबतच आगामी काळात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा सेनेचा भगवा फडकावण्यासाठी आपापसातील मतभेद, मनभेद दुर ठेवत एकजुटीने काम करा असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले.राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येत मुख्यमंत्री पदाची सूत्रे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेताच विरोधकांसह कोरोना संकटाचा यशस्वीपणे सामना करून आपण या पदासाठी सक्षम असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे 25 वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे हेच राहतील असाही विश्वास खासदार विचारे यांनी केला.
आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की,शिवसैनिकांच्या मनातील असंतोष शिवसेनेचे सरकार राज्यात असुनही छत्रपतींच्या रायगड जिल्ह्यात शिवसेना मात्र वंचित आहे या शब्दात व्यक्त केला. तरीही महाआघाडी सरकार चालवत असताना आम्ही हे सर्व सहन करु आपल्या पेक्षा विरोधकांमध्ये जास्त कलह आहेत त्यामुळे एकजुटीने काम करत पुन्हा एकदा रायगडमध्ये शिवसेनेला सत्तेवर आणू असा विश्वास व्यक्त केला.
शिवसेने तर्फे राज्यभर शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याचा पहिला टप्पा मराठवाडा, विदर्भात होत मुंबई बांद्रा कुर्ला कॉंप्लेक्स येथील विराट सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरील विरोधकांकडून होणाऱ्या टिकेला सडेतोड उत्तर दिल्यानंतर शिवसंपर्क अभियान २ ची घोषणा केली होती. त्यानुसार आता रायगड जिल्ह्यात ठाण्याचे खा. राजन विचारे यांचे मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येत आहे.
शिवसैनिकांना गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक हे ब्रीदवाक्य घेत तालुक्यात राज्यसरकारच्या योजना व शिवसेनेचे विचार पोहोचवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचेही आमदार दळवी यांनी सांगितले.
यावेळी कामगार नेते दीपक रानवडे, विलास चावरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.