आदिवासींमध्ये आमूलाग्र बदलाव
चंद्रकांत सुतार--माथेरान
तंत्रज्ञानाच्या काळात जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी आदिवासी बांधवांनीसुध्दा आपले पाय विविध क्षेत्रात भक्कमपणे रोवले असून जुन्या पेहारावला गुड बाय करून नव्या स्टाईलने आपल्या पेहरावात बदल केलेला आहे.माथेरान मध्ये दोन दिवस युथ सोशल क्लब आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल क्रीडा संकुलात भव्य अश्वशर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी मे महिन्यात या स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्यातील अनेक खेड्यापाड्यात वास्तव्यास असलेले आदिवासी बांधव मोठया संख्येने आपली हजेरी लावतात.विशेष म्हणजे पूर्वीचे आदिवासी आणि वर्तमानातील आदिवासी बांधव यांच्यात खूपच बदल झालेला त्यांच्या एकंदरीतच वागणूक आणि पेहरावावरून स्पष्टपणे दिसून येत आहे. अत्यंत टापटीप आणि स्पष्ट मराठी भाषा ते बोलत आहेत. त्यांच्या राहणीमानातील झालेल्या आमूलाग्र बदलाचे अनुकरण स्थानिकांनी करण्यासारखे आहे.
याबाबत त्यांच्याशी येथील जेष्ठ उद्योजक ज्ञानेश्वर बागडे यांनी संवाद साधला असता त्यांच्या या बदलाचे वैशिष्ट्य ऐकून ते अवाक झाले.आज माथेरान येथे अनेक वाडीतून आपले आदिवासी ( धोदानी , हाष्याची पटी , काटवाण , आंबेवाडी अनेक आदिवासी वाड्यातील तरुण ,तरुणी घोळक्या घोळक्याने रेस कोर्स वर शर्यती पाहण्यासाठी ,आनंद लुटण्यासाठी आले आहेत त्यांच्याकडे पाहून हेच का ते पूर्वीचे अर्धनग्न लोक ,अशिक्षित , अडाणी संभ्रम निर्माण झाला ,आता त्यांचे कपडे, केसाची स्टाईल पाहून असे वाटते की ते शहरातून कॉलेजचे विद्यार्थी आले आहेत , त्यांची प्रगती पाहून आनंद वाटतो ,काही जणांना विचारणा केली तर म्हणतात आमच्याकडे वाहतुकीचे साधन उपलब्ध झाले आहेत ,गावापर्यंत सरकारी बस येते , घरा घरात वाहन आहेत ,शहराशी दळवळण तसेच संपर्क साधतो ते पाहून गावागावांमध्ये सुधारणा झाली ,शिक्षण घेणे सुलभ झाले , मोलमजुरी जाणे येणे सुखदायी झाले , अनेक अडचणी दूर झाल्या , शून्यातून प्रगतीकडे वाटचाल ही त्यांच्याकडून आपल्याला घेण्यासारखी आहे , मला तर आनंदच झाला पण त्याचबरोबर आपणं कुठे तरी कमी पडतो किंवा आपण जुन्या रुढी परंपरा जपत तसेच चिकटून राहतो आणि आपल्या बरोबर येणाऱ्या पिढीला सुध्दा अंधारमय भविष्यात ढकलत आहोत असे वाटते , मी चर्मकार व्यवसाय करतो म्हणजे माझ्या मुलानेच ते करावे हा अधोगतीचा विचार आहे पण मी माझ्या मुलाला उच्च शिक्षण देऊन त्यास अधिकारी बनवून त्यास माझा पूर्वजांच्या धंद्या पासून वंचित ठेवला कारण मी यातील खोचा सहन केल्यात त्याचा अनुभव येण्यासाठी मला अर्ध जीवन घालवायला लागले , याचा अर्थ असा नाही की मी माझा व्यवसाय वाईट आहे किंवा त्याचा मला फायदा नाही झाला पण आताच्या या काळात आणि संघर्ष करण्याची ऊर्जा या पिढीत सीमित आहे , गाव गाव विकास झाला आपण अजुन बाबा आदमच्या जमान्यात आहोत ,माथेरानच्या काही तरुणाकडे आणि या आदिवासी तरुणाकडे पाहून असे वाटते की आपले तरुण कमीत कमी ५० वर्ष मागे आहोत त्यांच्यापेक्षा , गावाची प्रगीती होण्यासाठी क्रांती लागते आपल्या येथे स्वार्थाची पोळी भाजली जाते , येणाऱ्या पिढीचा विचार हेच गावाचे ब्रीद असले तरच गाव प्रगती पथावर जाईल.
ज्ञानेश्वर बागडे -- उद्योजक माथेरान
----------------------------------------------
माथेरान मध्ये मे महिन्याच्या अखेरीस अश्व शर्यती असतात त्या पहाण्यासाठी आजू बाजूच्या डोंगर दरीतील आदिवासी बांधव आपल्या लहान लहान मुलांसह एक दिवसीय पिकनिक करीता मोठ्या संख्येने माथेरानला येतात.आणि येथील सर्व व्यापारी लहान मोठे दुकानदार यांच्याकडे वडा पाव खाणे ,कोल्ड्रिंक्स, आईस क्रीम , बिस्लरी पाणी, चिक्की , जेवण , या करीता अगदी मनसोक्त खर्च करतात. त्यामूळे कोणत्या ही दुकानात माल शिल्लक रहात नाही.असे आमचे मनाने श्रीमंत असलेले आदिवासी ग्राहक.
जनार्दन पार्टे -- सामाजिक कार्यकर्ते माथेरान
----------------------------------------------