नगरसेवकांच्या पुढाकाराने नालेसफाई
महाराष्ट्र मिरर वृत्तसेवा
उल्हास नदीला गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे कर्जत शहरातील संजय नगर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर आदी भागात या पुराचे पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होत यावेळेस आमदार महेंद्र थोरवे यांनी उल्हास नदीपात्रातील गाळ काढल्याने तसेच कर्जत नगरपालिका हद्दीतील संजय नगर आणि छत्रपती शिवाजी महाराज नगर या भागातील नाले सफाई नगरसेवक संकेत भासे यांच्या पुढाकाराने झाल्याने येथील रहिवाशांची पुराच्या पाण्याने सुटका होणार असल्याने चांगला दिलासा मिळणार आहे.पोकलेनच्या माध्यमातून नगरसेवक संकेत भासे यांनी जातीने लक्ष देऊन ही नालेसफाई करून घेतली आहे.या नालेसफाईत नाल्याचे खोलीकरण करण्यात आल्याने पुराचे पाणी अडकून राहण्याची शक्यता कमी झाली असून नगरसेवक संकेत भासे यांनी राबवलेल्या या नालेसफाई बाबत येथील रहिवाशांनी नगरसेवक भासे यांचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहे.