खटावचे सुपुत्र जवान सुरज प्रताप शेळके यांना विरमरण
मिलिंदा पवार - खटाव
सध्याचे '१४१ फिल्ड रेजिमेंट 'लान्स नाईक पदावर सेवा बजावत होते असे असताना गुरुवारी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यांना जवळच्या सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु त्यांची प्राणज्योत मालवली.
शेळके यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचे आहे वडील प्रकाश शेळके खटाव येथील मिठाई व्यावसायिकाकडे काम करतात तर आई सुवर्णा अजूनही मोलमजुरी करतात तर भाऊ गणेश पदवीधर असून तोही सैन्य भरतीसाठी प्रयत्नशील आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वी सुरेश सुट्टीवर गावे खटावला आले होते . त्यांना या अशा जाण्याने सर्व खटाव तालुका शोकाकूल झाला होता. दि.२५ रोजी शासकीय इतमामात खटाव येथे त्यांच्या अंत संस्कार विधी पार पडला.