Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

पत्रकार व्हायचं !! आहे मग हे वाचा.

 माध्यम शिक्षण आणि रोजगार संधी

अनुप ढम

(लेखक हे इंटरनॅशनल स्कुल ऑफ ब्रॉडकास्टिंग अँड जर्नालिजम ,एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी,लोणी काळभोर पुणे येथे प्राध्यापक आहेत .)



दहावी झाली कि मग बारावी नंतर विद्यार्थ्यांना प्रश्न पडू लागतात कि आता पुढे काय करायचं? हेच प्रश्न त्यांच्या पालकांना हि सतावत असतात, आणि मग काका, मामा किंवा शेजारच्या सोनूला विचारून हि मुलं कुठल्यातरी शाखेला प्रवेश घेतात. बरं एवढं करून हि खरंच आपल्याला काय करायचं आहे याच उत्तर या मुलांना सापडत नाही आणि मग हि मुलं लोंढ्याबरोबर वाहत आपलं शिक्षण कसंतरी पूर्ण करतात किंवा मधेच सोडून देतात आणि पुन्हा बेरोजगारांच्या यादीत सामील होतात. यात ज्यांच्या पालकांनी भविष्याचा पूर्ण विचार करून चांगली शाखा निवडली अशी मुलं याला अपवाद आणि यशस्वी ठरतात.  मग काय करायला पाहिजे योग्य ती शाखा निवडण्यासाठी? तर उत्तर आहे विद्यार्थ्याला स्वतःची आवड माहिती असली पाहिजे, जे क्षेत्र खुणावत आहे अशा विषयांचे थोडेफार आकलन किंवा कौशल्य आपल्या जवळ असले पाहिजे म्हणजे मग शाखा निवड सोपी जाते. तसे नसल्यास पालकांनी आपल्या मुलांबरोबर चर्चा करून त्यांच्या आवडीचे विषय माहिती करून घ्यावे आणि तसे शाखा प्रवेश मिळवण्याचं प्रयत्न करावेत. आज आर्टस् सायन्स आणि कॉमर्स च्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ अली आहे, आपल्यावरूनच पहा ना आपण हे शिक्षण घेऊन आज काय करत आहोत ते. या शाखेत पदवीधर व्हायचे तर एकदम टॉपर झालात तरच भविष्य नाही तर आहेच सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाणपत्र. आता काही प्रात्यक्षिक आधारित कोर्सेस आहेत जे सर्वांना माहित नसतीलही, त्यातच संगणक, माहिती तंत्रण्याना विषयक किंवा ग्राफिक्स अनिमेशन, डिसाईन विषयाशी संबंधित शाखा ही आता सुरु आहेत. इथे मुलांना काही गती आहे का ते पाहावं, आणि असल्यास मुलांशी चर्च करून इथे प्रवेश मिळवावा. सगळेच डॉकटर इंजिनियर तर होणार नाहीत, पण कुणीतरी लेखक पत्रकार संगीतकार अभिनेता दिग्दर्शक नक्कीच होऊ शकतील. हो आणि आपण जे शिकलोय आणि जे काम करतोय याचा आनंद मात्र मुलांना नक्कीच असेल.

जनसंवाद आणि पत्रकारिता म्हणजेच मास कम्युनिकेशन अँड जर्नालिसम ही एक अशीच शाखा जिथे अशा बऱ्याच विषयांचं शिक्षण मिळू शकते. पत्रकारिता करायची म्हंटल तर आपल्याला समाज भान, इतिहास, भूगोल, राजकारण असे बरच विषय गरजेनुसार माहिती असणं महत्वाचं ठरतं, जे या कोर्स मध्ये होऊ शकतं. तसेच जर आपली आवड लेखन, कथा, कविता किंवा अभिनय असेल तरी या क्षेत्रातून आपण पुढे जाण्याचं मार्ग नक्कीच शोधू शकता. आजच्या आघाडीच्या लेखक दिग्ददर्शकांकडे पहिले आणि त्यांचे शिक्षण बघितले तर आपल्या लक्षात येईल कि ही विद्याशाखा किती पर्याय आपल्या समोर तयार ठेवते. अगदी सैराट फेम नागराज किंवा म्होरक्या फेम अमर देवकर किंवा ख्वाडा आणि बबन चे लेखक दिग्दर्शक भाऊ कऱ्हाडे असो, (सर्व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक) यांचं सर्वांचं शिक्षण हेच. जिथे त्यानं आपली गती सापडली, तशीच आपल्या मुलांना पण सापडू शकते का? तर हो पण फक्त आवड असून जमत नाही तर यांच्यासारखा यशस्वी होण्यासाठी तेवढेच प्रयत्न सातत्याने करत राहावं लागतं. मास कम्युनिकेशन अँड जर्नालिसम म्हंटल कि शिक्षण+पदवी+आवड+नोकरी= आता पुढे काय करायचं ह्या प्रश्नच उत्तर होय. खरंच आजमितीला या विद्याशाखेतून अनेक रोजगार संधी देखील उपलब्ध आहेत जसे कि आय टी कंपनीज साठी कंटेंट निर्मिती करणे, ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी कार्यक्रम बनवणे, टीव्हीसाठी मालिका बनवणे आणि आपल्यात काहींना तर वृत्त निवेदक होण्याचं स्वप्न इथेच पूर्ण करता येऊ शकतं, अगदी कोरोना काळात तर सगळी इंडस्ट्री बंद होती पण टीव्हीवरील कार्यक्रम, बातम्या, चित्रपट यातलं काही बंद नव्हते. आजच्या आघाडीच्या रिसर्च एजन्सीज सुद्धा या शाखेच्या मुलांना प्राधान्य देऊन प्लेसमेंट देतात तर इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस मध्ये सुद्धा आपण या शाखेतूनच जाऊ शकतो आणि आपलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करू शकतो.

याच क्षेत्रात उच्चशिक्षणासोबत संशोधन आणि महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये अध्यापनाच्या संधी देखील वेळो वेळी उपलब्ध होत असतात, तरी आपण आता काहीतरी वेगळं शिक्षण घेऊन रोजगार मिळवण्याच्या हेतूने या शाखेचे विचार करायला पाहिजे असे वाटते.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies