साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट उंब्रजच्या वतीने अजय गोरड यांचा सत्कार..
महाराष्ट्र मिरर टीम - कराड
उंब्रज येथील साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मोहिते यांनी उंब्रज पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी अजय गोरड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सलग तिसर्या वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ,. साईशा शैलेश मोहिते हिच्या हस्ते केक भरवून वाढदिवस साजरा केला सामाजिक राजकीय क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अधिकाऱ्यांचा ट्रस्ट नेहमीच सत्कार करीत असते यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शैलेश मोहिते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले पोलीस सहाय्यक निरीक्षक अजय गोरड यांनी राबवलेला प्रत्येक उपक्रम मग तो प्रत्येक गावात CCTV Camera उपक्रम असो अथवा वृक्षारोपण,गुन्हेगारीचे उच्चाटन, माता भगिनींची सुरक्षितता व कोव्हिडच्या कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी ही अतिशय उल्लेखनीय आहे यावेळी सपोनि अजय गोरड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्ट,समाजाचे काही देणं लागतो या उदात्त हेतुने सामाजिक बांधिलकीतुन विविध उपक्रम राबवत असतो सामाजिक व शैक्षणिक व आरोग्य विषयक क्षेत्रात गेली अनेक वर्षे साई मेडिकल अँड फाउंडेशन ट्रस्ट नेहमीच अग्रेसर असल्याचे यावेळी गौरवपूर्ण उदगार त्यांनी काढले यावेळी वाढदिवसानिमित्त .सयाजी साळुंखे अध्यक्ष कराड उत्तर कामगार आघाडी, श्री स्वामी समर्थ व्यसनमुक्ती केंद्र व कौन्सिलींग सेंटरच्या अध्यक्षा अश्लेषा शैलेश मोहिते,दत्तात्रय पवार शिवसेना उपतालुका प्रमुख कराड उत्तर , सुनिल पवार अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शिवाजीनगर (उंब्रज) ,सतीश साळुंखे,विनोद चव्हाण,वेदांत मोहिते,अथर्व अलटकर व साई मेडिकल फाऊंडेशन & चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी व उंब्रज पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते