संतोष दळवी - कर्जत
रायगड जिल्ह्यात महायुतीत सध्यातरी आग डोंब उसळला असून जे बंडोबा थंड झाले नाहीतर एकमेकांना पाडल्याशिवाय ते शांत होणार नाही असेच चित्र सध्या मतदारांपुढे उभ राहिलं आहे.महायुतीत कुठे राष्ट्रवादी अजित पवार गट तर कुठे शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात भाजप तर कुठे भाजप उमेदवार यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गट असे बंडाळीत असून एकमेकांचा हे बंडखोर उमेदवार निवडणुकीत पुरता बोजवारा करतील हे आता उघड झालं आहे.अर्ज मागे घेण्याची मुदत अजून तीन दिवसांची असली तरी हे बंडोबा थंड नाही झाले तर अधिकृत उमेदवाराला पराभव चाखायला मिळेल अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.
अलिबागेत शिवसेना शिंदे गटाचे महेंद्र दळवी यांच्या विरोधात भाजपचे दिलीप भोईर अर्थात छोटम शेठ यांचा अपक्ष अर्ज वैध ठरल्याने आता ते भाजपचे बंडखोर उमेदवार ठरले आहेत जर त्यांनी अर्ज मागे घेतला तर महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांचा मार्ग सुकर होईल.अन्यथा दळवी यांना शेकापच्या चित्रलेखा पाटील यांचं आव्हान असताना छोटम शेठ यांचा उमेदवारी अर्ज राहिल्यास महायुतीच्या मतांमध्ये विभागणी होणार आहे.
उरण मतदार संघात पूर्वीचे अपक्ष आमदार महेश बालदी यांना भाजप मध्ये घेऊन बालदी यांना भाजपने उमेदवारी दिली असल्याने शिवसेना शिंदे गटाची मीटिंग होऊन पत्रकार परिषद झाली त्यात शिंदे गटाने महेश बालदी यांचे काम न करण्याचा इशारा दिला आहे ही सीट भाजपच्या वाट्याला गेली असली तरी भाजपने बालदी यांच्याऐवजी स्थानिक भूमिपुत्र उमेदवार द्यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी केली .भाजपने स्थानिक भूमिपुत्र उमेदवार नाही दिल्याने शिंदे गट महायुतीच्या उमेदवाराचे कामच करणार नाही असं स्पष्ट केल्याने भाजपची पुरती कोंडी झाली आहे.
कर्जत मतदार संघात महायुतीचे अधिकृत उमेदवार महेंद्र थोरवे यांच्या विरोधात तत्कालीन राष्ट्रवादीचे आणि आताचे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी बंड केलं हे थोडके की काय भाजपनेही याच मतदार संघात बंडखोरी केली.महेंद्र थोरवे यांचा महायुतीतील या दोन अपक्ष एक सुधाकर घारे आणि भाजपचे पण आताचे अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी कोंडी केलीय.महायुतीतील या दोन घटक पक्षातील बंडखोर उमेदवारांनी बंड केलं असेल तरी थोरवे यांना महविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत यांच्या बरोबर सामना करायचा आहे.
दरम्यान अर्ज मागे घेण्याची मुदत अजून असून कोण कोण बंडोबा थंड केले जातात हे पाहणे महत्त्वाचे असून यावर सगळ्याच पक्षातील अर्थात महायुतीतील अधिकृत उमेदवार यांचं भविष्य सुनिश्चित होईल.