संतोष दळवी - कर्जत
कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत सध्या एकच नाव असलेले एकूण पाच उमेदवार आपलं नशीब अजमावत असून हे नामसाधर्म्य असलेले उमेदवार मुख्य उमेदवाराला मतांचा जबर फटका देतात आणि प्रसंगी मुख्य उमेदवाराला पराभूत व्हावं लागतं हा रायगडच्या राजकारणातील इतिहास आहे .
रायगड जिल्ह्यात जसे स्वतःच्या नावामागे " शेठ" लावायच फॅड आहे तसे निवडणुकीत एकच नावाचे अनेक उमेदवार उभे करून मतदारांना संभ्रमात टाकण्यात येते .माजी मंत्री व शेकाप नेत्या दिवंगत मीनाक्षी पाटील यांना त्यांच्या मुख्य विरोधक उमेदवाराला पराभूत करून एकूण दुसऱ्या सहा मीनाक्षी पाटील यांना पराभूत करायचं होत.त्या निवडणुकीत काँग्रेसचे मधुकर ठाकूर विजयी झाले होते आणि मीनाक्षी पाटील यांचा पराभव झाला होता आणि या सहा मीनाक्षी पाटील यांनी जवळ जवळ ६ ते ७ हजार मते खाल्ली होती असा इतिहास रायगडच्या राजकारणात नवीन नाही पण मुख्य उमेदवाराच्या वडिलांचे नाव माहिती नसल्यास कुठल्या उमेदवाराचे बटन दाबायच असा संभ्रम मतदारांसमोर होतो.शिवाय मुख्य उमेदवार आणि त्यांचे पक्ष चिन्ह मतदारांपर्यंत पोहचायला फार कमी कालावधी असल्याने ते उमेदवार आणि त्यांचे चिन्ह मतदारांपर्यंत कसं कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोहचवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दोन महेंद्र थोरवे आणि तीन सुधाकर घारे यांचे अर्ज आज वैध ठरल्याने कोण कुणाला फटका देतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान ४ तारखेपर्यंत कोण कोण अर्ज मागे घेतो यावर सगळा निवडणुकीचा खेळ अवलंबून असल्याचे बोलले जाते.