महाराष्ट्र मिरर टीम - कर्जत
आज शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी राजाभाऊ कोठारी सरांच्या २०१६ची टी .वाय. बी कॉम च्या बॅचच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने गेली ८ वर्षे आदिवासी वाडीतील बांधवांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करण्यात येते. या वर्षी सुद्धा लक्ष्मीपूजन निमित्त डोणे वाडी, नांगुर्ले वाडी व भिसेगाव आदीवासीवाडी येथे आज फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी डॉ.प्रशांत सदावर्ते, संजीव ठाकरे, जयवंत म्हसे ,संदीप पाटील,रुपेश ठाकरे, अंकित सोनावणे, मिलिंद कनौजिया, शुभम कदम,सौरभ देशमुख, संकेत हर्णे, वैभव जगताप, प्रथमेश कुडेकर, अभिजित जंगम वसंत देशमुख, मितेश डागा, राणी लोवंशी, जशोदा देवडा,पुष्पलता वर्मा ,मयुरी मोरे, अशोक शेडगे , रघुनाथ ठाकरे इत्यादी अनेक जण उपस्थित होते.
दर वर्षी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम अखंडित चालू राहील. आदिवासी बांधवांसोबत दरवर्षी दिवाळी साजरी करण्यात आमच्या सर्वांचा उत्साह व आनंद द्विगुणित होतो व हा आनंद गगनात मावत नाही.
ही दीपावली सर्व आदिवासी बांधवांचा सुखा ,समाधानाची व भरभराटीची जावो या शुभेच्छा ही भावना याप्रसंगी राजाभाऊ कोठारी यांनी व्यक्त केली.