महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांचा तटकरेंवर घणाघात!!
संतोष दळवी - कर्जत
सुनील तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे तो वेळीच काढला पाहिजे अशी सडकून टीका महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी कर्जत येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सडकून टीका तर केली पण गंभीर आरोपही या पत्रकार परिषदेत केल्याने राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या टीकेला काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
कर्जतमधील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे सुनील तटकरे यांचे पिल्लू असून पाप सुध्दा असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.महायुतीचा धर्म इतर घटक पक्ष पाळत असताना तटकरे पाळत नाही असा गंभीर आरोप करत महाड मध्ये उमेदवार भरत गोगावले आणि नासिक मधील उमेदवार सुहास कांदे यांच्याबाबतीत तटकरे कारस्थाने करत असल्याचा आरोप थोरवे यांनी केला.भ्रष्टाचार कसा करायचा हे तटकरे यांना चांगल माहिती आहे.माझ्या विकासकामांत तटकरे कसा खोडा घालतात याचा पाढाच त्यांनी या पत्रकार परिषदेस वाचला.तटकरे यांना महायुती तून हाकलून द्यावे असेही त्यांनी निक्षून सांगितलं.अशा आत्मघातकी नेतृत्वाचा निषेध करत असून त्यांच्यात गद्दारीचा डीएनए असल्याचा आरोपही महेंद्र थोरवे यांनी केला.
महायुतीतील एका उमेदवाराने इतक्या गंभीर स्वरूपाचे आरोप आणि सडकून टीका प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केल्याने महायुतीत याचे काही पडसाद उमटणार का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.