Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

“कोविड-19-करोना विषाणू” काळजी करू नका..काळजी घ्या !

                                                                         

*“कोविड-19-करोना विषाणू”    काळजी करू नका..काळजी घ्या !*

*जिल्ह्यात 589 जणांनी केली करोनावर मात, सध्याची रुग्ण संख्या 412*

अलिबाग, 


  स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील 589 रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर आज 42 नव्या करोना बाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना +ve  असलेल्या (Active Cases) नागरिकांची संख्या पनवेल मनपा-171, पनवेल ग्रामीण-60, उरण-22, खालापूर-7, कर्जत-21, पेण-9, अलिबाग-29, मुरुड-9, माणगाव-34, तळा-6, रोहा-18, सुधागड-1,  श्रीवर्धन-4, म्हसळा-8, महाड-1, पोलादपूर-12 अशी एकूण 412 झाली आहे.
       कोविड-19 ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा-303, पनवेल ग्रामीण 124, उरण-131, खालापूर-2, कर्जत-4, पेण-4, अलिबाग-7, माणगाव-6, तळा-1, श्रीवर्धन-5, महाड-1, पोलादपूर-1 अशी एकूण 589 आहे.           
       आज दिवसभरातही पनवेल मनपा-21, पनवेल ग्रामीण-10 पेण-2 असे  एकूण  33 नागरीक करोना विरोधातील लढाई जिंकून पूर्णपणे बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत.
         आतापर्यंत पनवेल मनपा-22, पनवेल ग्रामीण-9, उरण-1, खालापूर-1, कर्जत-2, अलिबाग-2, मुरुड-2, श्रीवर्धन-2, म्हसळा-2, महाड-3, पोलादपूर-1 असे एकूण 47 नागरिक मृत पावले आहेत. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुर्देवाने यशस्वी होऊ शकले नाहीत.
          आज दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत पनवेल मनपा-23, पनवेल (ग्रा)-10, उरण-1, खालापूर-1, अलिबाग-4, माणगाव-2, राेहा-1 अशा प्रकारे एकूण 42 ने वाढ झाली आहे.
           आजच्या दिवसात एकाही व्यक्तीची मृत व्यक्ती म्हणून नोंद झालेली नाही.
         आतापर्यंत जिल्ह्यातून 3 हजार 650 नागरिकांचे SWAB कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून  तपासणी अंती त्यापैकी 2 हजार 422 नागरिकांचे रिपोर्ट  ‘-’ ve प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती  रिपोर्ट  मिळण्यासाठी प्रलंबित असणाऱ्या नागरिकांची संख्या 178 आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies