Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

वाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर रुग्ण संख्या 21 वर,


वाढता कोरोना कर्जतकरांसाठी निर्णायक वळणावर 
रुग्ण संख्या 21 वर, 

गणेश मते-कर्जत


जगभरात थैमान घातलेल्या कोरोना महामारीने आता कर्जत तालुक्यातही प्रवेश केल्याने भीतीमय चिंतेचे वातावरण आहे. बुधवार 27 मेपर्यंत तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या 20 झाली होती. यातील 4 जण बरे होऊन घरी परतले असून 2 जणांचा मृत्यू झाला. मात्र, आज शुक्रवारी अचानक तब्बल 7 रुग्णांची भर पडल्याने माथेरानसह तालुक्यातील आरोग्य स्थिती निर्णायक वळणार असल्याचे दिसते. 

मुंबई आणि पुण्याच्या मध्यावर असले तरी रायगड जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत पनवेल वगळता कोरोनाबधितांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. मात्र, कर्जत तालुक्यात कोरोनाने प्रवेश केला नव्हता. दरम्यान, 20 एप्रिल रोजी नेरलमध्ये पहिला रुग्ण आढळला. यामुळे मात्र कर्जतकर आणि सरकारी यंत्रणेचे धाबे दणाणले. सदर रुग्ण लवकरच बरा होऊन परतला तरी परिस्थिती चिंताजनक होऊ लागली. त्यानंतर कर्जत शहरातील संजयनगर, गुंडगे यासह ग्रामीण भागातील ओलमनसारख्या भागात आता कोरोनाने प्रवेश केला आहे. याबाबत, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात हेत असल्या तरी यातील बहुतांशी बाधित हे मुंबई बाहेरचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर कर्जत नगरपरिषदेने 28 ते 30 मे दरम्यान बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

बुधवरपर्यंत बाधितांची संख्या 20 होती. यातील 4 जण बरे होऊन घरी परतले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे बधितांची संख्या आता 14 असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आज शुक्रवारी अचानक 7 जणांचे कोरोना तपासणी अहवाल पोसिटीव्ह आले. यामध्ये कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांसह
निवृत्त वन कर्मचारी यांचा 22 वर्षीय मुलगा त्यांच्या सतत संपर्कात राहिल्याने त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, माथेरांमध्येही 4 जंणांचे अहवाल पोसिटीव्ह आले आल्याने तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या 21 झाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies