खरंच देव हरवलाय का ??? - महाराष्ट्र मिरर

Breaking

Post Top Ad

Friday, May 29, 2020

खरंच देव हरवलाय का ???

 @अभिषेक सुर्वे


खरंच देव हरवलाय का ???

आजची परिस्थिती पहिली की लोक म्हणतात आता देव कुठे हरवलाय....आता परमेश्वराला या आजारासाठी तोंड देण्याचे सामर्थ्य देतोय का असा प्रश्न सर्वांच्या समोर उभा आहे. कोण म्हणतय सध्या सगळ्या जातीय धर्माची धार्मिक स्थळे  बंद आहेत, पण धार्मिक स्थळे बंद असली तरी देव काही देव्हाऱ्यात नाही तो आमच्या हृदयात आहे.
 काही लोकांच्या मते या कोरोना सदृश्य परिस्थितीत काम करतायत ते फक्त डॉक्टर आणि शासकिय कर्मचारी.......हो नक्की ते सध्या आपला जीव मुठीत घेऊन लोकांचे जीव वाचविण्याचे काम करत आहेत..... पण माझ्या मतानुसार आजही आपण परमेश्वराने दिलेल्या सूत्रांचे पालन न केल्यामुळे ही परिस्थिती ओढवलीय असं म्हटलं तरी हरकत नाही कारण आज आपण स्वतःच्या प्रगतीसाठी, सुखासाठी त्यांनी निर्माण केलेल्या निसर्गाची व आयुष्याशी खेळ खेळतोय......
दररोज कुठल्यानं कुठल्या रुपात म्हणा किंवा काही संकेत देऊन तो आपल्याला सावरण्याचा प्रयत्न करतो पण आपल्याच मर्जी प्रमाणे वागणारा माणूस मात्र बदलत नाही. आज कोरोना सदृश्य परिस्थितीत काम करणारा प्रत्येक माणूस घरातून निघताना परमेश्वराला हात जोडून नक्की सांगत असेल मला घरी येताना सुखरूप आणि निरोगी पाठव...
मग तरीसुद्धा आपण पैशापायी, वैयक्तिक सुखपायी दोष मात्र त्या विधात्याला देतो. या परिस्थितीतून  नक्कीच देव आपल्याला  बाहेर काढेल पण एकदा का आपले दगडा खालचे हात निघाले की आपण मात्र आपल्या स्वप्नात जगायला मोकळे होतो.... 
मागील अनेक दिवस वाचनात किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय की दर शंभर वर्षांनी ही परिस्थिती जगावर येते आणि त्यातून आपण सावरतो आणि पुन्हा नव्याने जीवनाला आकार देतो, याचाच अर्थ असा की देव आपल्याला परिस्थितीची जाणीव सुद्धा करून देतोय आणि संधी सुद्धा म्हणून हे परमेश्वरा तुझी कृपा दृष्टी आम्हा सर्वांवर राहू दे आणि लवकरच हे विघ्न  टळू दे ...
म्हणून देव नाही हरवला आपण मात्र त्याला विसरतोय......हे नक्की
No comments:

Post a Comment